आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नमस्तेने सुरुवात अन् जयहिंदने शेवट! शाहरूखचा डायलॉगही, पाहा ओबामांचे Speech

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मार्गदर्शन करताना बराक ओबामा
नवी दिल्ली - दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडि टोरियममध्ये बराक ओबामांनी भाषणाला सरुवात करताच उपस्थितांची मने जिंकली. सुरुवातीलच नमस्कार करत शाहरूख खानच्या डीडीएलजे चित्रपटातील 'सेनोरिटा... बडे बडे देशो मे...' असा डायलॉग ओबामांनी मारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर त्यांनी विवेकानंदाच्या शिकागोतील भाषणाच्या आठवणी जागवत उपस्थितांना, My Brother's and Sisiter's of India म्हणून संबोधताच सभागृहात टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडला.
(ओबामांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहा, अखेरच्या स्लाइडवर)
ओबामा यांनी बॉलीवूड स्टार शाहरुख खान, बॉक्सर मेरी कोम आणि अॅथलिट मिल्खा सिंह यांचा उल्लेख केला. या सर्वांवर भारतीयांना अभिमान आहे. जोवर भारतात सर्व धर्मांचा सन्मान होत राहील तोवर भारत विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत राहील, असे ओबामा यावेळी म्हणाले.
भारताबाबात बोलताना ओबामा म्हणाले की, रिपब्लिक डे परेडदरम्यान महिलांच्या तुकड्यांचे संचलन पाहून मला आनंद झाला. एवढेच नव्हे तर मला एका महिलेने गार्ड ऑफ ऑनर दिला. आम्ही एका अशा देशात आहोत, ज्याठिकाणी एका आचार्‍याचा नातू राष्ट्रपती बनतो आणि एक चहा विकणार्‍या व्यक्तीचा मुलगा देशाचा पंतप्रधान बनतो. गरीबी वेगाने दूर होत असेल्या देशांपैकी भारत एक आहे.
तरुणांवर जोर देताना ओबामा म्हणाले की, तरुणांच्या हातात संपूर्ण जगाचे भवितव्य आहे. भारतात बहुतांश नागरिक 35 पेक्षा कमी वयाचे आहेत. मी राष्ट्रपती बनलो तेव्हा थोडा तरुण होतो, पण आता माझे केस पांढरे होत आहेत असे ओबामा म्हणाले.
ओबामांनी भारताबरोबर झालेल्या अणु नागरी सहकार्य कराराबाबत बोलताना सांगितले की, या करारामुळे भारतात वीजेच्या पुवठ्यात वाढ होइल. जनधन योजनेचा उल्लेख करत त्यामुळे सर्व नागरिक बँकांपर्यंत पोहोचतील असे, ओबामा म्हणाले. तसेच भारतात बुलेट ट्रेन सुरू करण्याचा उल्लेखही ओबामांनी केला.
भारतातील अस्पृश्यतेचा उल्लेख करत ओबामांनी अमेरिकेतही ही समस्या असल्याचे सांगितले. ओबामा म्हणाले, माझ्या जीवनातही अशी वेळ आली होती, जेव्हा माझ्या रंगामुळे मला वेगळी वागणूक मिळाली होती. मिशेल यांचे पूर्वज दास होते, माझे पूर्वजही तसेच होते, असेही ओबामा यावेळी बोलताना म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे आपण समर्थन करत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ओबामा म्हणाले. भारताच्या नेतृत्वाचे कौतुक करत ओबामा म्हणाले की, दक्षिण आशियामध्ये गरिबी आणि आजारांशी लढण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.

त्याआधी ओबामा म्हटले होते की, भारताला दोन व्यक्तींमुळे जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे. ते म्हणजे महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद. गांधीजी लोकांसाठी झगडत राहिले. मार्टिन ल्यूथर किंग यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. तर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत माझ्याच शिकागोमध्ये, माझ्या बंधु भगिनींनो म्हटले होते. आज मी भारतात म्हणू इच्छितो, माझ्या बंधू भगिनींनो. त्यांनी अमेरिकेला हिंदुत्व आणि योगाचे महत्त्व पटवून दिले.
बाईकने फिरायचे होते पण..
भारत दौर्‍यादरम्यान बाईकने फिरण्याची इच्छा होती. पण सुरक्षेच्या कारणामुळे मला तसे करता आले नाही, असे बराक ओबामांनी यावेळी सांगितले.
सत्यार्थींची भेट घेतली
ओबामांनी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांची भेटही घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबामा यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे रेकॉर्डींग केले असून त्याचे प्रसारण रात्री आठ वाजता करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरोबर 1.50 वाजता नवी दिल्लीहून सौदी अरबकडे रवाना होतील. सौदीचे शासक किंग अबदुल्लायांच्या निधनामुळे ओबामांचा भारत दौरा कमी करण्यात आला आहे. ओबामांच्या ताज महाल येथील भेटीचा कार्यक्रम त्यामुळेच रद्द करण्यात आला आहे.

काही खास मुलांचीही भेट घेणार
सिरी फोर्टमधील कार्यक्रमापूर्वी ओबामा यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिलालेल्या कैलाश सत्यार्थी यांची भेट घेतली. कैलाश बचपन बचाओ अभियानाचे नेते आहेत. बारमजुरीच्या विरोधातील कार्याची दखल घेऊन त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, Photo's
अखेरच्या स्लाइड्वर पाहा ओबामांच्या भाषणाचा VIDEO