आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : अस्वलाने घेतला वन कर्मचा-याचा जीव, 24 तासांत दोघांना मारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/सूरजपूर - सूरजपूरच्या प्रेमनगर येथील जंगलात एका अस्वलाने 24 तासांत दोन कर्मचा-यांचा जीव घेतला आहे. ही घटना 22 डिसेंबरची असून आजच तिचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या अस्वलाचा हा व्हिडिओ समोर आला आहे, त्याने 22 डिसेंबरला 24 तासांत दोघांचे प्राण घेतले होते.
VIDEO पाहा अखेरच्या स्लाईडवर...

दोन कर्मचा-यांबरोबरच या अस्वलाने परिसरातील सुमारे 30 बक-या फस्त केल्याची माहितीही मिळाली आहे. जंगली अस्वलावर नियंत्रम मिळवण्यासाठी वन विभागाच्या अधिका-यांना त्याच्यावर गोळी झाडावी लागली, त्यात अस्वलाचा मृत्यू झाला आहे.

प्रेमनगरच्या कसियारीपारा परिसरात या अस्वलाने गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवली आहे. अस्वलाच्या विरोधात रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाकडे तक्रार करत होते. या अस्वलाला ठार करण्याची मागणी हे लोक करत होते. पण वनविभागाने त्याची परवानगी दिली नव्हती.
22 डिसेंबरच्या सकाळी जेव्हा वन विभागाचे कर्मचारी कृष्णपाल सिंह गावात गेले त्यावेळी जंगलात प्रवेश करत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी बराच वेळ संघर्ष केला. पण अस्वलाने त्यांनी गंभीर जखमी केले होते. त्यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वनविभागाने अस्वलाला मारण्याचा आदेश दिला.
पुढील स्लाइडवर पाहा, इतर काही PHOTO आणि VIDEO पाहा अखेरच्या स्लाईडवर...