आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटिंग रिट्रीट : पाकिस्तानमध्ये घोषणाबाजी तर भारतात शांतता, पाहा PHOTO

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पाकिस्तानच्या बाजुला गर्दी तर भारताच्या हद्दीत शांतता अशी परिस्थिती सोमवारी पाहायला मिळाली.
बीटींग रिट्रीट सोहळ्याच्या काही क्षणापूर्वी पाकिस्तानने आपण सोहळा साजरा करणार असल्याची सूचना भारताला दिली. त्यामुळे इतक्या कमी वेळात तयारी करणे शक्य नसल्याने केवळ औपचारिकता पाळली. पण मंगळवारपासून नियमितपणे ही सेरेमनी होणार असल्याचे बीएसएफ प्रमुख डीके पाठक यांनी सांगितले.
आज जे घडले ते आतापर्यंत पूर्वी कधीही घडलेले नाही. अगदी 1965 आणि 1971 च्या युद्धाच्या काळातही हा सोहळा असाच सुरू राहायचा. पण यावेळी पाकिस्तानमुळे सोमवारी भारताला केवळ औपचारिक सहभाग नोंदवावा लागला.
पाकने अचानक निर्णय बदलल्यामुळे बीटिंग रिट्रीटमध्ये रोजच्या सुमारे 20 हजारहून जास्त लोकांच्या असणा-या उपस्थितीच्या तुलनेत सोमवारी अक्षरशः स्मशान शांतता होती. याठिकाणी केवळ बीएसएफचे जवान होते. प्रवेशाच्या ठिकाणी असलेली दुकानेही बंद होती. जे लोक याठिकाणी आले होते, त्यांनाही बीएसएफने अडवले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बीटिंग रिट्रीटचे PHOTO