आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Because Of Popularity They Planing To Kill Me , Modi Critise On Congress

माझी लोकप्रियता पचनी पडत नसल्याने कारस्थाने,बंगळुरूत मोदींचा काँग्रेसवर प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - एका महिलेची हेरगिरी केल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी तडाखेबंद उत्तर दिले. आपली लोकप्रियता आणि सभांना होणारी गर्दी काँग्रेसच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच आपल्याविरुद्ध कटकारस्थाने रचली जात आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
बंगळुरू येथील पॅलेस मैदानावर मोदी यांची भव्य सभा झाली. काँग्रेस लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप या वेळी त्यांनी केला. ते म्हणाले, माझ्या बाजूने बोलणा-यास काँग्रेस लक्ष्य करत आहे. मग त्या लता मंगेशकर असोत की ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म असो.अलीकडे भाजपसोबतच मोदींवरही हल्ले वाढले आहेत. हल्ले या दृश्यामुळे (जनसमुदायाकडे निर्देश करून) वाढले आहेत. हे त्यांच्या पचनी पडत नाही. कटकारस्थाने रचली जात आहेत. कोणत्या कोणत्या पद्धतीने भाजपला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. कोब्रापोस्ट आणि गुलेल डॉट कॉम या पोर्टल्सनी केलेल्या भंडाफोडानंतर मोदींनी ही टीका केली आहे.