आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअरच्या बाटलीवर महात्मा गांधींच्या रेखाचित्र मुळे संताप, कंपनीने मागितली माफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद/ वॉशिंग्टन - भारतीय श्रद्धास्थानांचा अमेरिकेत केल्या जाणाऱ्या अवमानाच्या मालिकेत निर्ढावलेल्या कंपन्यांनी आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे रेखाचित्र चक्क बिगरचे कॅन बाटल्यांवर वापरून भारतीय भावना भडकावल्या आहेत. या प्रकारानंतर हैदराबादेत एक याचिका दाखल होताच या बिअर कंपनीने माफी मागितली.

न्यू इंग्लंड या बिअर निर्मिती करणाऱ्या कंपनीने महात्मा गांधी यांचे रेखाचित्र असलेला हा ब्रँड बाजारात आणल्यानंतर अमेरिकी भारतीयांत प्रचंड संताप पसरला. भारतातही याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. दरम्यान, महात्मा गांधी यांची नात आणि नातू यांनी हे रेखाचित्र वापरण्यास आपली हरकत नसल्याचे स्पष्ट केल्यावरच हा ‘गांधी बॉट’ ब्रँड बाजारात आणला असल्याचा कंपनीचा दावा आहे.

म्हणजे आत्मशुद्धी...
कंपनीनेआपल्या वेबसाइटवर बिअरची वैशिष्ट्ये सांगताना गांधी बॉट एक सुगंधित संपूर्ण शाकाहारी तसेच आत्मशुद्धीसाठी उपयुक्त पेय असल्याचे म्हटले आहे. महात्मा गांधी यांचा सविनय कायदेभंग अहिंसेच्या तत्त्वांबद्दल जाणून घेण्याच्या दृष्टीने हा ब्रँड प्रेरणा देईल, असेही वेबसाइटवर नमूद आहे.
म्हणे शांततेचा संदेश...
‘गांधीबॉट’च्या माध्यमातून शांतिदूत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचा शुद्ध हेतू होता, असे कंपनीने माफीनाम्यात म्हटले आहे. महात्माजींचा सन्मान व्हावा हीच कंपनीची भावना असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.
सुंकारी जनार्दन यांची याचिका
सायबराबादमधीलमहानगर दंडाधिकाऱ्यांकडे अॅड. सुंकारी जनार्दन यांनी यासंबंधी एक याचिका दाखल केली असून महात्मा गांधी यांचे बिअरच्या बाटली कॅनवर रेखाचित्र वापरणे भारतीय कायद्यान्वये गुन्हा असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, राष्ट्रीय पुरुषांच्या अवमानविरोधी १८७१ चा कायदा तसेच कलम १२४ अन्वये हा गुन्हा ठरतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, ब्रँड बंद होणार का?