आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार बंद न होता ५२ ड्राय डेंनी सुरुवात, केरळमध्ये दारूवरून संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिवेंद्रम - केरळमधील शिस्तप्रिय मद्यप्रेम क्वचितच अन्य ठिकाणी असतील. सायंकाळ होताच मद्यासाठी लोकांची दुकानासमोर रांग लागते. या वेळेत एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जाते. शांततेने आपला क्रमांक येण्याची वाट पाहत मद्यपी विजयाच्या आवेशात खिडकीजवळ पोहोचतात. आवडीच्या ब्रँडची बाटली कागदात गुंडाळून हसतमुखाने एक-एक बाहेर पडतो. मात्र, आता हे हसू मावळण्याची उलट गणती सुरू झाली आहे.

दक्षिणेतील या राज्यात दारू केवळ सरकारी दुकांनातून मिळते. सरकारचे वार्षिक उत्पन्न साधारण ९ हजार कोटी रुपये आहे. यावर पाणी सोडत मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये दरवर्षी १० टक्के दुकाने बंद केली जातील. यावर्षीच्या गांधी जयंतीत ३३८ पैकी ३३ दुकानांना कुलूप लावण्यात आले. येत्या दहा वर्षात राज्यात संपूर्ण दारूबंदी होईल. तोपर्यंत रविवारी सर्व दुकाने बंद राहतील, म्हणजे वर्षांत ५२ ड्राय डे.
चांडी यांना हा निर्णय आता घेतला आहे. मात्र, खासगी हॉटेल्सचे बार बंद करण्याच्या कृतीमुळे या राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. मार्चमध्ये त्याची सुरुवात झाली. व्यवस्थित सेवा न देणाऱे ४१८ बार बंद करण्यात आले.

एका वर्षात ढोसली जाते
२२ कोटी लिटर दारू
८.४३ कोटी लिटर बिअर

बार बंदीनंतर उत्पन्नात वाढ
मार्चमध्ये ४१८ बार बंद झाल्यामुळे सरकारचे उत्पन्न वाढले. मार्चआधी ५० दुकानांतून साधारण तीन कोटी रुपयांची दारू विक्री होत होती. सध्या पाच ते आठ कोटी रुपयांची रोजची विक्री आहे.