आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Obama Visit Terrorists Target India, Plan Makes In Pakistan

ओबामांच्या दौ-याआधी भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पाकमध्ये शिजतोय कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौ-या आधी भारतात शाळांसारख्या 'सॉफ्ट टार्गेट'वर अतिरेकी हल्ल्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळे, बाजारपेठांत हल्ल्याचा प्रयत्न होऊ शकतो. पाकिस्तानातील वॉर रूममध्ये तसा कट रचला जात आहे, असा दावा जम्मू- काश्मिरात तैनात लेफ्टनंट जनरल के.एच. सिंह यांनी केला. ते म्हणाले, आयएसआयच्या नेतृत्वाखाली वॉर रूममध्ये लष्कर व अतिरेकी कमांडर सहभागी आहेत.
कुठे, केव्हा व कसा हल्ला करायचा हे ठरत आहे. पीर पंजाल भागात ३६ लाँच पॅडवर २०० अतिरेकी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पाकमध्ये आत्मसमर्पण करणा-या तालिबान्यांचा हल्ल्यांसाठी वापर होऊ शकतो. दरम्यान, असे हल्ले उधळून लावू, असा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे.