आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before The Blast Bomb Placed In Buddhagaye Sushilkumar Shinde

बुद्धगयेत रात्री बॉम्ब ठेवण्‍यात आले, स्फोटांमागे चार जणांचा हात- गृहमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धगया - बुद्धगयेत ठेवण्यात आलेले बॉम्ब शनिवारी रात्री ठेवण्यात आले, असे सांगून या साखळी स्फोटांमागे तीन ते चार जणांचा हात असावा, असा संशय केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि गृहमंत्र्यांनी बुधवारी बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, बॉम्बस्फोटप्रकरणी ताब्यात घेतलेल्या चार जणांना पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता.


दोन सर्वोच्च तपास संस्था या कामी नेमण्यात आलेल्या आहेत. दहशतवाद्यांच्या समस्येचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून अनेक जणांची चौकशी करण्यात येत आहे. गृहमंत्री आणि सोनिया गांधी यांनी स्फोट झालेल्या व बॉम्ब पेरलेल्या प्रत्येक ठिकाणाची पाहणी केली. 13 पैकी 10 बॉम्बचे स्फोट झाले. सर्व बॉम्ब रात्रीच पेरून ठेवण्यात आले होते आणि पहाटे 5 ते 6 वाजेदरम्यान स्फोट झाले, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.


स्वत:हून चौकशीसाठी हजर
स्फोटप्रकरणी एका तरुणीसह चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची बिहार पोलिस, एनआयए आणि गुप्तचर संस्था आयबीनेही कसून चौकशी केली. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपलेही चित्र आहे हे कळल्यानंतर हे चौघे स्वत:हून बुद्धगयेचे पोलिस अधीक्षक जयकांत यांच्याकडे गेले होते.


6.30 ला चेक आऊट
बुद्धगया मंदिराशेजारील हॉटेलची रूम एक तरुणी व तीन जणांनी रविवारी पहाटे बुक केली व सकाळी साडेसहाला सोडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चौघे मंदिराजवळ फिरताना दिसले. परंतु केवळ मंदिर पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. स्फोट झाल्याचे कळल्यानंतर मंदिरास भेट देणे अशक्य असल्याने चेक आऊट केले, असे या तरुणांनी पोलिसांना सांगितले.