आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेजरच्या वीरमरणाच्या अवघे 4 तास आधी पत्नीला मिळाले होते सतीश यांचे Anniversary गिफ्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांगल चौधरी (हरियाणा) - काश्मीरच्या हिंदवाडा येथे दहशतवाद्यांसोबतच्या एन्काऊंटरदरम्यान 14 फेब्रुवारी रोजी शहीद झालेले मेजर सतीश दहिया यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट पाठवले होते. योगायोग असा की मेजरच्या पत्नीला ते गिफ्ट पतीच्या शहादतच्या अवघे चार तास आधी मिळाले होते. दुपारी 3 वाजता सुजाता यांना पार्सल मिळाले आणि सायंकाळी 7 वाजता सतीश शहीद झाले. रात्री 9 वाजता त्यांची माहिती कुटुंबियांना कळाली. 
 
DainikBhaskar.com सोबतच्या बातचीतमध्ये शहीद मेजर यांच्या पत्नीने सांगितले की व्हॅलेंटाइन डेला दुपारी 3 वाजता एक पार्सल मिळाले. त्या दिवशी मी जयपूरमध्ये होते. मेजर सतीश यांनी ते पार्सल पाठवले होते. त्यांनी मुलीसाठी कपडे आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक, कँडल, ग्रीटिंग कार्ड आणि गोव्याचे दोन तिकीट पाठवले होते. 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने ते गोवा येथे जाणार होते. 

- पार्सल पाहिल्यानंतर सुजाता यांचे सतीश यांच्यासोब बोलणेही झाले होते. 
- मेजर सतीश, सुजाता यांना नेहमी म्हणायचे की एक दिवस मला राष्ट्रपती पदक नक्की मिळेल. 
 
नारनौल जिल्ह्यात आहे शहीद सतीश यांचे गाव 
- शहीद मेजर सतीश दहिया यांचे गाव नारनौल जिल्ह्यातील बनिहाडी आहे. 
- 2008 मध्ये त्यांनी एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली होती. दोन वर्षांच्या ट्रेनिंगनंतर त्यांना जम्मूमध्ये लेफ्टनंट पदी नियुक्ती मिळाली होती. 
- 17 फेब्रुवारी 2011 मध्ये त्यांच्या गावा शेजारील पवेरा येथे सुजाता चौधरीसोबत त्यांचे लग्न झाले होते.
- 2012 मध्ये सतीश यांना प्रमोशन मिळाले होते. गेल्या दीड वर्षापासून त्यांची पोस्टींग जम्मूच्या हंदवाडा येथे होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...