आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: भिक्षेतुन मिळवलेला एक-एक रुपया गोळा त्याने मुक-बधीर मुलींना वाटले कपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेसाणाः व्यक्तीजवळ अत्यंत कमी धन असेल आणि त्यातही त्या व्यक्तीने ते दान केले तर त्या दानाचे महत्त्व अनेक पटीने वाढते. असेच काही चित्र गुजरातच्या महेसाणा येथे पहायला मिळते. महेसाणाच्या गोदडाया बापू (खीमजीभाई प्रजापती) हे एक भिक्षुक आहेत, पण त्यांची वर्तणूक एखाद्या मोठ्या दानशूर व्यक्तीप्रमाणे आहे. नेहमी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणार्‍या लोकांसाठी खीमजीभाई यांचे जीवन एखाद्या उदाहरणापेक्षा कमी नाही. प्रजापती दिवसभर शहरातील सीमंधर, मंदिर, हनुमान मंदिर आणि साई मंदिराच्या बाहेर बसून भिक्षा मागतात. मंदिरात येणारे भक्त त्यांना रुपया, पाच रुपये दान देऊन पुण्य कमावतात तर प्रजापतिही या दानाचा स्वीकार करतात.
या प्रकारे महिना-दोन महिन्यानंतर भिक्षेतून जमलेली रक्कम एकत्र करून त्या पैशांना कोणालाच कळू नये या प्रकारे ते दान करतात. हेच यांच्या जिवनाचे उद्दिष्ट आहे. सोमवारी गोदडाया बापू यांनी जमा केलेल्या पैशांतून कपडे विकत घेतले आणि हे कपडे मुक-बधीर मुलांच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिले. प्रजापती यांनी शाळेतील 22 मुलींना भेट म्हणून नवीन कपडे दिले. हे कपडे देत असताना प्रजापतींनी माझे जीवन धन्य झाले असे उदगार काढले.
मुळचे सौराष्ट्रचे राहणारे खीमजीभाई प्रजापती मागील 17 वर्षांपासून महेसाणा जिल्ह्यात भिक्षा मागतात. प्रजापती बापू दिवसभर सीमंधर मंदिर, हनुमान मंदिर आमि साई मंदिराच्या बाहेर बसून भिक्षा मागतात. आणि भिक्षेतुन जमा झालेली रक्कम खिमजीभाई प्रजापती एकत्रकरून वृद्धाश्रम, रुग्णालय आणि मुलींसाठी दान करतात. त्याचबरोबर दररोज कुत्र्यांना बिस्कीट खाऊ घालणे हा त्यांच्या नित्य दिनक्रम आहे.
प्रजापती यांची पत्नी अल्सरच्या आजाराने ग्रस्त असून त्या गावात राहतात. गोदडीया बापू नियमितपणे पत्निला पैसे पाठवतात. ते म्हणतात की, "माझे आयुष्य एका साधू प्रमाणे आहे. परंतु ज्या व्यक्तीसोबत सात फेरे घेतले जर मी त्या व्यक्तीची मदत केली नाही, तर देव मला भिक्षा देणार नाही. देवाने प्रत्येक व्यक्तीला जीवन दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने यथाशक्ती गरजूंना मदत करायला हवी."

पुढील स्लाईडवर, प्रजापती यांचे मुलांना कपडे वाटतानाची इतर छायाचित्रे...