आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beggar Who Live In Muzaffarnagar Camp, Atik Ahmed Critised

मुजफ्फरनगरच्या मदत छावण्यांमध्ये राहणारे व्यावसायिक भिकारी,अतिक अहमद यांचे मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मुजफ्फरनगरच्या मदत छावण्यांमध्ये राहणारे सर्व व्यावसायिक भिकारी असल्याची मुक्ताफळे समाजवादी पार्टीचे नेते अतिक अहमद यांनी उधळली आहेत. दंगलग्रस्तांना 15 लाख रुपये आणि नोक-या दिल्या जात असल्यामुळे व्यावसायिक भिकारी दंगलग्रस्त म्हणून दाखवले जात आहेत, असे ते म्हणाले.
समाजाच्या प्रत्येक वर्गात भिकारी आढळतात. त्यामुळे मदत छावण्यांमध्येही व्यावसायिक भिकारी घुसले असल्याचे प्रत्येकालाच माहिती आहे. दंगलीत होरपळलेल्या प्रत्येकाला 15 लाख रुपये आणि नोकरी दिली जात आहे. त्यामुळेच मदत छावण्यांमध्ये व्यावसायिक भिकारी घुसले आहेत, असा आरोप अहमद यांनी केला. अहमद हे सपाचे माजी खासदार आहेत.
उत्तर प्रदेशच्या सरकारी आकडेवारीनुसार कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 35 बालके मृत्युमुखी पडली आहेत.