आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Behavior Adviser Watch On Commonwealth Nations MPs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रकुल देशांतील खासदारांवर वर्तणूक सल्लागारांची देखरेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - संसदेत खासदारांच्या बेशिस्त आचरणावर अंकुश लावण्यासाठी ५६ राष्ट्रकुल देशांच्या संसदेत वर्तणूक आचारसंहिता लागू करण्याच्या जागतिक प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लवकरच इस्लामाबाद येथे राष्ट्रकुल संमेलन होणार असून त्यात खासदारांसाठीच्या आचारसंहितेला मंजुरी िदली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खासदारांच्या सार्वजनिक आचरणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक संसदेत एका सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. खासदारांविरोधात येणा-या तक्रारींवरही या सल्लागारामार्फत देखरेख ठेवली जाणार आहे.

खासदारांसाठी वर्तणूकसंहिता तयार करणा-या राष्ट्रकुल देशांच्या टीममध्ये छत्तीसगड विधानसभेचे मुख्य सचिव देवेंद्र वर्मा यांचा समावेश होता.भारतातून समावेश झालेले वर्मा हे एकमेव सदस्य आहेत. या कामासाठी त्यांना ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया स्टेच्या विधिमंडळात बोलावण्यात आले होते. यासंदर्भातील समितीने आठ ते दहा एप्रिल या काळात आदर्श आचारसंहितेचा मसुदा तयार केला. ही संहिता तयार करणा-या टीमनुसार प्रत्येक खासदार व विधानसभांमध्ये आचरण सल्लागार व तपास अधिका-यांची नेमणूक केली जाणार आहे. आचरण सल्लागार या पदावर नि:पक्ष, स्वतंत्र व बिगर राजकीय व्यक्तीचीच नेमणूक करावी लागणार आहे. राजकीय व्यक्तींना त्यापासून दूर ठेवले जाईल. तसेच संसद खासदार व लोकप्रतिनिधींविरोधात मिळालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचा अधिकार तपास अधिका-याला असेल. तपासानंतर अधिकारी त्यांचा अहवाल सभापतींना सादर करतील व त्याआधारे संबंधितावर कारवाई करता येईल.

सर्वपक्षीय सहमती बनवू:नायडू
राष्ट्रकुल देशांच्या खासदारांसाठी तयार करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेबाबत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले, आम्ही याचा अभ्यास करू व नंतर सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चा करून त्यावर सर्वसहमती बनवण्यासाठी प्रयत्न करू.

यासाठी भासली गरज
कॉमनवेल्थ पार्लमेंट्री असोसिएशनमध्ये आफ्रिका, आशिया, युरोप व अमेरिका खंडातील ५६ देशांत १४६ शाखा आहेत. कॅमरूनमध्ये २ ते १० ऑक्टोबर २०१४ दरम्यान ६० वी पार्लमेंट्री कॉन्फरन्स झाली होती. त्यात खासदार व जनतेला जवळ आणण्यासाठी व त्यांच्या संवाद प्रस्थापित करण्यासाठी नवी आचारसंहिता तयार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. तसेच अशी आचारसंहिता तयार करण्यावरही एकमत झाले होते.