आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind 1984\'s Sikh Riot Congress Senior Leader Played Important Role

\'कॉंग्रेसच्या नेत्यांनीच भडकवली होती शीख विरोधी दंगल\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- गुजरात दंगलीवरून मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप करणा-या कॉंग्रेसला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. 1984 साली शीख विरोधी दंगल भडकवण्‍याचे काम कॉंग्रेसच्‍या आघाडीच्‍या नेत्‍यांनीच केले होते, असा आरोप त्‍यांनी केला आहे.

2002 च्‍या गुजरात दंगलीवरून कॉंग्रेस नेहमी मोदींवर बिनबुडाचे आरोप करीत असते. मोदींनी दंगल भडकवली नव्‍हती. मात्र, 1984 मध्‍ये कॉंग्रेस आघाडीच्‍या नेत्‍याने 'जेव्‍हा मोठा वृक्ष पडतो, तेव्‍हा पृथ्‍वी हादरते' असे सांगून शीखांविरोधातील दंगल भडकवली होती, असे राजनाथ सिंह यांनी म्‍हटले.

कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍वाखाली सत्तेत असलेले युपीए सरकार सर्वच आघाडयांवर अपयशी ठरले आहे. त्‍यासाठी त्‍यांनी राजकीय अजेंडा बदलून धर्म निरपेक्षता व सांप्रदायिकतेचा नवा वाद सुरू केला आहे, असे ते म्‍हणाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेस 'फोडा आणि राज्‍य करा' ही नीती वापरत असल्‍याचाही आरोप केला आहे.