आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind Rohit Vemula's Suicide: Updates And Follow Ups

रोहित वेमुला आत्‍महत्‍या प्रकरण : प्राध्‍यापकांनी दिली राजीनाम्‍याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणावरून देशभर विद्यार्थी आंदोलन तीव्र झाले. यात आता विद्यापीठातील दलित प्राध्‍यापकांनीही उडी घेतली असून, राजीनाम्‍याची धमकी दिली आहे.
स्‍मृती इराणी दिशाभूल करत असल्‍याचा आरोप
रोहित आणि त्‍याच्‍या इतर सहकाऱ्यांना निलंबित करण्‍याचा आदेश देणाऱ्या कार्यकारी परिषदेच्‍या उप-समितीमध्‍ये एक वरिष्‍ठ दलित प्राध्‍यापक असल्‍याचा दावा केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये केला होता. मात्र, इराणी यांचे हे वक्‍तव्‍य पूर्णत: खोटे असून, या समितीमध्‍ये कुणीही दलित प्राध्‍यापक नव्‍हता, असे दलित आणि आदिवासी प्राध्‍यापकांनी म्‍हटले आहे.
प्राध्‍यापकांनी दिली राजीनाम्‍याची धमकी....
- केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी बुधवारी पत्रकार परिषदेमध्‍ये म्‍हणाल्‍या, इराणींनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले, विद्यार्थ्यांच्या भावना भडकवण्यासाठी या प्रकरणाला दलितविरुद्ध दलितेतर असा रंग देण्याचा हेतुत: प्रयत्न केला जात आहे.
- रोहितने आपल्‍या पत्रात कुणालाही जबाबदार धरले नाही. तसेच या प्रकरणी आपल्‍या कॉंग्रेसचे खासदार हनुमंत राव यांनीही पत्र लिहिले होते, असेही इराणी म्‍हणाल्‍या.
- त्‍या म्‍हणाल्‍या, ''ज्‍या समितीने निलंबनाची कारवाई केली त्‍या समितीतील एक वरिष्‍ठ प्राध्‍यापक दलित होते.
- परंतु आता हैदराबाद विद्यापीठातील एससी, एसटी प्राध्‍यापकांनी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांचा या प्राध्‍यापकांपी निषेध केला.
- या प्रकरणात स्मृती इराणी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही प्राध्‍यापकांनी केला आहे.
काय म्‍हणते संघटना...
दलित आणि आदिवासी प्राध्‍यापक संघटनेचे एस. सुधाकर बाबू म्‍हणाले, ''विद्यार्थ्‍यांवर ज्‍या समितीने निलंबनाची कारवाई केली. त्‍या समितीत एकही दलित प्राध्‍यापक नव्‍हता. इराणी खोटे बोलत आहेत.''
अरविंद केजरीवाल घेणार रोहितच्‍या कुटुंबीयांची भेट
- दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी हैदराबादला जाणार आहेत. त्‍या ठिकाणी ते रोहितच्‍या कुटुंबीयांची भेट घेतील.
- यापूर्वी बुधवारी रात्री एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी दलित विद्यार्थ्‍यांची भेट घेतली.
- सायंकाळी विद्यार्थ्‍यांनी कँडल मार्च काढला

पुढील स्लाइडवर वाचा, आतापर्यंत 9 विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या