कोलकाता- पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमात स्वतंत्र सैनिकांना दहशतवादी म्हणून संबोधिण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात 'रिव्हॉल्यूश्वेरी टेररिज्म' हे एक प्रकरण आहे. त्यात शहीद खुदीराम बोस, जतिंद्रनाथ मुखर्जी आणि प्रफुल्ल चाकी यांना दहशतवादी म्हटले आहे.
शहीद खुदीराम बोस, जतिंद्रनाथ मुखर्जी आणि प्रफुल्ल चाकी यांच्याबाबत 'दहशवादी' असे शब्दप्रयोग करणे देशद्रोहापेक्षा कमी नसल्याचे इतिहासकार आतिश दासगुप्ता यांनी म्हटले आहे. भविष्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांनाही दशहतवादी म्हणाल काय? असा सवालही दासगुप्त यांनी केला आहे.
दुसरीकडे, राज्य सरकारने माध्यमिक शिक्षण मंडळाची पाठराखण केली आहे. स्वातंत्र सैनिकांबाबत अशा शब्दांचा वापर करून तत्कालिन स्थिती दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या सूत्रांनी म्हटले आहे. शिक्षण मंडळाच्या समितीने योग्य ठिकाणी योग्य शब्दाची निवड करायला हवी होती. तरी याप्रकरणी राज्य सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, यापूर्वीही अशाच एका वादात अडकले होते बॅनर्जी सरकार....
(फोटो- 'रिव्हॉल्यूश्वेरी टेररिज्म'चे छायाचित्र)