आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरुच्या एका कॉलेजने गे प्रोफेसरला केले बरखास्त, सांगितले- मर्यादा ओलंडत होते.

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - येथील एका कॉलेजने प्रोफेसर अॅश्ले टॅलिस यांना ते गे असल्याच्या कारणावरुन बरखास्त केले आहे. तुमच्या व्यक्तिगत मतांमुळे विद्यार्थी तुमच्यावर नाराज असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कॉलेजविरोधी कारवाईचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. 
 
इंग्रजीचे प्रोफेसर आहे टॅलिस 
- अॅश्ले टॅलिस हे बंगळुरुच्या सेंट जोसेफ आर्टस् अँड सायन्स कॉलेजमध्ये इंग्लिश डापार्टमेंटमध्ये असोसिएट प्रोफेसर होते. 
- त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या.
- प्रोफेसर टॅलिस हे लेस्बियन-गे-बायसेक्शुअल-ट्रान्सडेंजडर (LGBT)अॅक्टिव्हिस्ट म्हणूनही परिचीत आहेत.  
 
टॅलिस यांनी फेसबुकवर लिहिले 
- प्रोफेसर टॅलिस यांनी कॉलेज प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. 
- ते म्हणाले, '9 मार्च रोजी मी बी.कॉम सेकंड इअरचा क्लास घेत होतो. प्रिन्सिपल फ्रांसिस व्हिक्टर लोबो यांनी तातडीने भेटण्यास बोलावले.'
- 'मला 10 मिनिट बाहेर बसण्यास सांगितले. त्यावेळी माझे विद्यार्थी वर्गात माझी वाट पाहात होते.'
- त्यानंतर प्रिन्सिपलने मला बोलावले आणि ते म्हणाले, तुमची मते विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम करणारी आहेत. तुम्ही स्वतःहून नोकरी सोडली तर चांगलं होईल.
- टॅलिस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, माझी इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी परेशान राहिले पाहिजे. 
- हे कोणत्याही शिक्षकाचे कामच आहे की त्याचे विद्यार्थी परेशान राहिले पाहिजे. जर विद्यार्थी आनंदी-आनंदात राहिले तर जगात बदल कसे होतील. 
- शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालेल्या परंपरा तोडण्यासाठी त्यांना त्रास देत असेल तर ते त्या शिक्षकाचे यश आहे. 
- यासाठी मला बरखास्त करणे हे योग्य वाटत नाही. 
- माझ्यासाठी हे नवीन नाही. असेही नाही की ही घटना शेवटची असेल. मात्र मी हार मानणार नाही. 
 
कॉलेजचे स्पष्टीकरण 
- टॅलिस यांच्या आरोपांवर कॉलेज प्रशासन म्हणाले, 'प्रोफेसर अॅश्ले यांना नोव्हेंबर 2016 मध्ये 6 महिन्याच्या करारावर घेण्यात आले होते. मुलाखतीमध्येच त्यांना स्पष्ट हे सांगण्यात आले होते.'
- 'मात्र नंतर त्यांची बौद्धिक गुणवत्ता पाहून त्यांचे कौतूक देखिल झाले. त्यांना स्कॉलरशिपही दिली गेली. आम्ही त्यांना संवेदनशिल मुद्द्यांवर विद्यार्थ्यांवर आपले विचार थोपवू नये असे लिखित स्वरुपात सांगितले होते.' 
- अनेक विद्यार्थी आणि पालकांनी तक्रार केली की प्रो. अॅश्ले त्यांच्या मर्यादा ओलांडत आहेत. त्यानंतर प्रशासनाने त्यांना काढण्याचा निर्णय घेतला. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...