आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझ्यूम दमदार, मुलाखतीविना नोकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू (कर्नाटक) - बंगळुरूच्या २१ वर्षीय सुमुख मेहताच्या रिझ्यूमने प्रभावित होऊन लंडनच्या जीक्यू( जेंटलमॅन्स क्वार्टरली) मॅगझिनने त्याला मुलाखत न घेताच आपल्या मुख्यालयात नोकरी दिली. सुमुखचा रिझ्यूम अत्यंत प्रभावी आणि नावीन्यपूर्ण होता. एम्प्लाॅयर्स त्यामुळे प्रभावित झाले.

‘हायर मी ’ नावाने त्याने रिझ्यूम तयार केला. आपण सर्जनशील असून त्याला पुष्टी देणारी माहितीही त्याने यात टाकली. सुमुख मेहता व्यवस्थापनशास्त्रात पदवीधर आहे. विपणन चमूसाठी त्याने जीक्यू स्टाइल २० पानी रीज्यूम तयार केला.

सुमुखने याला कव्हर पेजही तयार केले आहे. याचा लेआऊट एखाद्या मॅगझिनसारखा दिसतो. या २० पानांत त्याने आपला अनुभव, शैक्षणिक पात्रता, छंद याशिवाय अनेक बारीकसारीक तपशील दिला आहे. त्याचा रिझ्यूम दुर्लक्षित होणे केवळ अशक्यच होते. हा तयार करायला ३ आठवडे लागले. यासाठी त्याने फोटोशूट, ग्राफिक डिझाइनिंग स्वत:च केले आहे.

आज जगात सर्वत्र स्पर्धा आहे. अशावेळी तुम्ही कल्पक असणे फार महत्त्वाचे असल्याचे सुमुखने सांगितले. तुम्हाला वाटते तसेच व्हावे अशी इच्छा असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. मीदेखील तेच केले असे सुमुख सांगतो. यापूर्वी १५० एमबीए झालेल्या व्यावसायिकांचे रिझ्यूम आपण तयार केले होते असे सुमुखने सांगितले. यात इन्फोग्राफिकचा वापर केला होता. रिझ्यूम कसा सादर करावा याचे ज्ञान आपल्याला होते.

अनेक लोक तपशीलवार रिझ्यूम सादर करण्यास नकार देतात. मात्र मला माझ्यातील गुणांची खात्री होती. त्यामुळे २० पाने तयार करण्याचे निश्चित केले. ब्रिटिश जीक्यूचे मुख्य संपादक डायलान जॉन्स रीज्यूम पाहून प्रभावित झाले. त्यांनी मुख्यालयातच नोकरीची ऑफर दिली. मला मुलाखत देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...