आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंगळुरू छेडछाड : तरुणीला 35 सेकंद बळजबरी ठेवले होते पकडून, CCTV फुटेजमधून खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणीबरोबरची ही घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. - Divya Marathi
तरुणीबरोबरची ही घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
बेंगळुरू - 31 डिसेंबरच्या रात्री याठिकाणी असलेल्या प्रसिद्ध एमजी रोज आणि ब्रिगेड रोडवर अनेक तरुणींबरोबर झालेल्या छेडछाडीशी संबंधित अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत. पोलिस अनेक ठोस पुरावे मिळाल्याचे दावे करत आहेत. एक व्हिडीओ फुटेजही समोर आले आहे. त्यात दोन तरुण एका तरुणीबरोबर छेडछाड करत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका तरुणाने तरुणीला जवळपास 35 सेकंदांपर्यंत बळजबरीने पकडून ठेवले आणि तिचा विनयभंग करत राहिला. बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून घेतला आहे. पोलिस 45 सीसीटीव्ही फुटेजमधून पुरावे शोधत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

नव्या व्हिडीओत काय.. 
- तरुणीबरोबरची ही घटना ईस्ट बेंगळुरूच्या 5th मॅन रोडवरील एका सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना रात्री 2:30 च्या सुमारास घडलेली आहे. 
- व्हिडीओत तरुणी एका सामसूम रोडवरून एकटी जात असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी मागून एका स्कुटरवर दोन जण येतात. आधी पुढे गेल्यानंतर ते पुन्हा मागे पीडितेकडे येतात. त्यापैकी एक तरुण स्कूटरवरून खाली उतरतो आणि बळजबरी तिला पकडून ठेवतो. 
- सुमारे 35 सेकंद हा तरुण तिला पकडून ठेवतो. 
- तरुणी तिला वारंवार धक्का देण्याचा प्रयत्न करते. पण तिला यश मिळत नाही. 
- तरुणीला तो तरुण स्कूटरजवळ खाली पाडतो. जवळच काही लोक उभे असल्याचेही दिसते. 
- एएनआय या न्यूज एजन्सीने हे फुटेज जारी केले आहे. 

काय घडले होते 31 डिसेंबरला?
- 31 दिसंबरच्या रात्री एमजी आणि ब्रिगेड रोडवर तरुणांचा जल्लोष होत होता. रात्री 11 च्या सुमारास काही टोळके तरुणी आणि महिलांबरोबर गैरवर्तन करू लागले. 
- त्यांनी महिलांवर वाईट कमेंट्स सुरू केले. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता. 
- पोलिसांच्या मते याठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुमारे 60,000 लोक जमलेले होते. 

तरुणींची धावपळ.. 
- मीडिया रिपोर्ट्स नुसार टवाळांच्या गोंधळामुळे मुली इकडून तिकडे पळू लागल्या होत्या. अनेक मुले मुली अक्षरशः त्यांचे बूट चप्पल सोडून पळाले. 
- पोलिस पोहोचले त्यावेळी अनेक तरुणी रडत पोलिसांकडे गेल्या आणि मदत मागू लागल्या. 
- नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांनी 1600 जवान तैनात केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित काही Photo अखेरच्या स्लाइडवर पाहा Video
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...