आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरुत नव्या वर्षाच्या पार्टीत मुलींची छेडछाड, कपडे फाडले; मदतीसाठी सैरावैरा धावल्या पीडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगलुरुतील कथित छेडछाडीचा ट्विटरवर शेअर होत असलेला फोटो. (स्त्रोत : ट्विटर) - Divya Marathi
बंगलुरुतील कथित छेडछाडीचा ट्विटरवर शेअर होत असलेला फोटो. (स्त्रोत : ट्विटर)
बंगळुरु - 31 डिसेंबरच्या रात्री येथील प्रसिद्ध एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर अनेक मुलींची छेड काढण्यात आली. टवाळखोरांनी मुलींच्या मागे लागून त्यांना भररस्त्यावर पळवले. काही मुली मदतीसाठी सैरावैरा धावत सुटल्या तेव्हा त्यांच्या सँडल्स रस्त्यावर पडल्या होत्या. विशेष म्हणजे ज्या मार्गावर या घटना घडल्या तेथे 1600 पोलिस सुरक्षेसाठी तैनात होते. सोमवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणीही पोलिसात तक्रार दाखल केली नाही. मात्र प्रकरण एवढे चिघळले की कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यातही त्यांनी अशा घटना होतच असतात असे सांगून आगीत तेल ओतण्याचे काम केले.
काय झाले होते थर्टीफस्टच्या रात्री 
- 31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोड येथे नविन वर्षाचा जल्लोष सुरु होता. रात्री साधारण 11 वाजता हुल्लडबाज मुले महिला आणि मुलींना स्पर्ष करु लागले. त्यांच्यावर अभद्र टिप्पणी करायला सुरुवात केली. हा धिंगाणा अर्धातास सुरु होता. त्यानंतर तिथे गोंधळ सुरु झाला. 
- पोलिस अधिकारी नागराज यांनी सांगितले, की नव वर्ष स्वागतासाठी येथे साधारण 60 हजार लोक जमा झाले होते. 
गृहमंत्री काय म्हणाले
- कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, ख्रिसमस आणि नववर्षाच्या जल्लोषासाठी सुरक्षेची पुरेशी तरतूद केली गेली होती. मात्र अशा प्रसंगी असे प्रकार होतातच. घटना घडली त्या ठिकाणी जवळपास 25 सीसीटीव्ही लावण्यात आले होते. सरकार प्रकरणाची चौकशी करत आहे. 
 
     पुढील स्लाइडमध्ये पाहा, बंगळुरुतील कथित छेडछाडीचा व्हिडिओ.. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...