आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरुमध्‍ये तरुणीशी गैरवर्तन: पाठलाग करुन मारहाण, आरडाओरड करताच पळाला आरोपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसस्‍थानकावर एकटी पाहून युवकाने केली छेडछाड, मदतीला कुणीही समोर आले नाही. - Divya Marathi
बसस्‍थानकावर एकटी पाहून युवकाने केली छेडछाड, मदतीला कुणीही समोर आले नाही.
बंगळुरु - नववर्षानिमित्‍त झालेल्‍या उत्‍सवामध्‍ये तरुणींशी झालेल्‍या गैरवर्तणुकीची घटना ताजी असतानाच बंगळुरुमध्‍ये छेडछाडीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. घटना शुक्रवारी उत्तर बंगळुरुमध्‍ये एका बसस्‍थानकावर घडली. सकाळी 6.30 वाजता ऑफिसला जाण्‍यासाठी तरुणी उभी असताना एका युवकाने गैरवर्तणुक करण्‍याचा प्रयत्‍न केला. तरुणी एकटीच होती म्‍हणून त्याच्या तावडीतून सुटण्‍साठी चालण्‍यास सुरवात केली. मात्र युवकाने तिचा पिच्‍छा सोडला नाही. यादरम्‍यान तिला पकडण्‍याचाही प्रयत्‍न केला. 
 
शेवटी तरुणीला रस्‍त्‍यावर मदतीसाठी धावावे लागले. मात्र मदतीला कोणीही पुढे आले नाही. यादरम्‍यान झालेल्‍या झटपटीत तरुणीला हात, पाय आणि जिभेवर जखमा झाल्या. मात्र तरुणीने जोरात आरडा ओरडा केल्‍यामुळे आरोपी घाबरुन पळून गेला.  
    
गेल्या सात दिवसातच बंगळुरुमध्‍ये घडलेली ही तिसरी घटना आहे. 31 डिसेंबरच्‍या रात्री एमजी आणि ब्रिगेड रोडवर नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी जमलेल्‍या तरुणींसोबत काही हुल्‍लडबाज तरुणांनी गैरवर्तन केले होते. या घटनेचा विराट कोहली, आमिर खान आणि अक्षय कुमार यांनी निषेध केला होता. 
 
या तिन्‍ही प्रकरणातील साम्‍य म्‍हणजे महिलांच्‍या बचावासाठी कुणीही पुढे आले नाही. 
 
- ही घटना उत्‍तर बंगळुरुतील केजी हाली परिसरातील आहे. 
- तरुणी शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता ऑफिसला जाण्‍यासाठी अरेबिक कॉलेज बस स्‍थानकाजवळ थांबली होती. 
- तरुणीला एकटी पाहून एका युवकाने गैरवर्तन करण्‍याचा प्रयत्‍न केला. 
- वाचण्‍यासाठी तरुणील धावावे लागले. युवकानेही तिचा पाठलाग केला.
- यादरम्‍यान युवकाची आणि तिची झटापट झाली. युवकाने तिला चावा घेण्‍याचाही प्रयत्‍न केला. 
- तरुणीच्‍या हात, पाय आणि जिभेवर जखमा झाल्‍या आहेत. 
- यादरम्‍यान तरुणीने खुप आरडा ओरड केली. पण खूप वेळानंतरही कुणीच मदतीला आले नाही.
- आरोपीने तरुणीला जमिनीवर आटपले व नंतर घटनास्‍थळावरुन पळ काढला. 
- ही सर्व घटना सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 
- याप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला आहे. मात्र आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. 
 
31 डिंसेबरला 2 युवकांनी एका तरुणीसोबत असेच केले होते कृत्‍य 
- पूर्व बंगळुरुमध्‍ये 31 डिसेंबरला मध्‍यरात्री घरी जाणाऱ्या तरुणीसोबत अशीच घटना घडली होती. 
- दोन युवकांनी तरुणीला रस्‍त्‍यात एकटे गाठून गैरवर्तन केले होते. 
- यादरम्‍यान तिला मारहाण झाली होती. शेवटी युवकांनी तरुणीला रस्‍त्‍यावर आपटून पळ काढला होता. 
- यादरम्‍यान रस्‍त्‍यावरील लोकांनी बघ्‍याची भूमिका घेतली होती. कोणीही तरुणीच्‍या मदतीला समोर आले नव्‍हते.  
- ही सर्व घटना सीसीटीव्‍हीत कैद झाली होती.
- याप्रकरणातील 4 आरोपींना ताब्‍यात घेतले आहे. 
 
नववर्षाच्‍या उत्‍सवादरम्‍यान काय घडले होते बंगळुरुमध्‍ये 
- 31 डिसेंबरला शहरातील एमजी आणि ब्रिगेडरोडवर मोठया प्रमाणात युवक-युवती नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी जमले होते.                
- रात्री अकरा वाजता अचानक काही तरुणांनी गोंधळ घालण्‍यास सुरवात केली. 
- मुलींना स्‍पर्श करण्‍यासोबतच त्‍यांचे कपडे ओढण्‍यापर्यंत या मुलांची मजल गेली. 
- मुली मदतीसाठी सैरावैरा धावत राहिल्‍या. पण मोजकेच पोलिस बंदोबस्‍तासाठी तैनात होते. 
- परिस्थितीवर ताबा मिळविण्‍यासाठी शेवटी मोठा पोलिस फौजफाटा बोलवावा लागला. 
- पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.     
- पोलिस निरिक्षक नागराज यांनी सांगितले आहे की, महोत्‍सवासाठी जवळपास 60,000 लोक जमा झाले होते. 
 
सँडल आणि शूज सोडून पळाल्‍या होत्‍या मुली 
- घटनास्‍थळी पोलिस आणि प्रसार माध्‍यमे पोहोचली तेव्‍हा तरुणी सँडल आणि शूज सोडून मदतीसाठी धावत होत्‍या. 
- महिला पोलिस कर्मचारी घटनास्‍थळी पोहोचताच कित्‍येक तरुणी त्‍यांच्‍या गळयात पडून रडत होत्‍या.   
 
पुढील स्लाईडवर बघा, बंंगळुरुमधील तरुणींनी या घटनेचा निषेध करण्यासाठी अशी निदर्शने केली.....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...