आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरुची पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर भारतीने केले सुसाइड, घरात घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 मध्ये उबेर कंपनीची भारतातील पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून निवड झाल्यानंतर भारती चर्चेत आली होती. - Divya Marathi
2013 मध्ये उबेर कंपनीची भारतातील पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून निवड झाल्यानंतर भारती चर्चेत आली होती.
बंगळुरु - बंगळुरूची पहिली महिला टॅक्सीचालक भारती विरथ (४०) आपल्या भाड्याच्या घरात सोमवारी रात्री मृतावस्थेत आढळली. आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील रहिवासी असणारी भारती कॅब सर्व्हिसशी संबंधित होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आत्महत्येचे वाटत आहे. भारती आपल्या खोलीत पंख्याला लटकलेली घरमालकाला आढळली. तिच्या खोलीतून सुसाइड नोट मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे. भारती दोन वर्षांपूर्वी बंगळुरूची पहिली महिला टॅक्सीचालक म्हणून प्रकाशझोतात आली होती. ती अनाथ होती आणि तिने लग्नही केले नव्हते.

देशातली पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर
- उबेर टॅक्सीची देशातील पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर भारती नॉर्थ बंगळुरुमधील नागाशेटीहल्ली भाघात राहात होती.
- भारती मुळची तेलंगणामधील वारंगल येथील रहिवासी होती. मात्र कामा निमीत्त ती बंगळुरुमध्ये एकटी राहात होती.
- पोलिस उपायुक्त टी.आर सुरेश म्हणाले, 'भारतीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.'
- तिच्या घरातून पोलिसांना सुसाइड नोट मिळाली नाही. त्यासोबतच घरात कोणी बळजबरीने घुसले होते असेही काही पुरावे सापडलेले नाही.
- पोलिसांना प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे वाटत आहे. मात्र तपासांतीच कोणत्याही निर्णयापर्यंत जाता येईल असे पोलिस म्हणाले.

सर्व प्रथम घर मालकाने पाहिले
- भारतीच्या शेजाऱ्यांनी सांगितले, की सोमवारी सकाळी 7 वाजता या घटनेची माहिती मिळाली.
- भारतीचे घर मालक म्हणाले,'रविवारी रात्री ती दिसली नाही, म्हणून सोमवारी सकाळी तिला पाहायला गेलो होतो. तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये राहात असलेली भारती तेव्हा पंख्याला लटकलेली होती. त्यानंतर मी तत्काळ पोलिसांना कळवले.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतीचे फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...