आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधीच होतील पंतप्रधानः बेनीप्रसाद वर्मा, नरेंद्र मोदींना म्‍हणाले \'पागल कुत्रा\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुजरात दंगलीसंदर्भात नरेंद्र मोदींनी 'कुत्र्याचे पिल्‍लू' शब्‍दा वापरून केलेल्‍या वक्तव्‍यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मोदींवर विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे. आता त्‍यात कॉंग्रेसचे नेते आणि केंद्रीय पोलदा मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी उडी घेतली आहे. वर्मा यांनी एका भाषणामध्‍ये मोदींचा उल्‍लेख 'पागल कुत्रा' असा केला. त्‍यामुळे हा वाद चांगलाच चिघळण्‍याची शक्‍यता आहे. दुसरी बाब म्‍हणजे, वर्मा यांनी राहुल गांधी हेच पुढील वर्षी पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे. एकीकडे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे राहुल गांधी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणून घोषणा करण्‍यात येणार नसल्‍याचे सांगतात. तर दुसरीकडे वर्मा हे राहुल गांधीच पंतप्रधान होणार असल्‍याचा दावा करीत आहेत.

वर्मा यांनी एका कार्यक्रमात सांगितले, की लोहपुरुष सरदार पटेल आणि कॉंग्रेस या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत. त्‍यामुळे पटेल यांचा भव्‍य पुतळा उभारण्‍याची मोदींची घोषणा केवळ एक नाटक आहे. अशा पागल कुत्र्याला भारत मातेची प्रतिमा मलिन करु देणार नाही, असे वर्मा म्‍हणाले.

मोदींवर आणखी टीका करताना वर्मा म्‍हणाले, मोदी हे मतांचे व्‍यापारी आहेत. ते संकोचित मानसिकता असलेले नेते आहेत. अल्‍पसंख्‍यांकावर अत्‍याचार केल्‍याचे आरोप असलेल्‍यांसोबत त्‍यांचे संबंध आहेत.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी रॉयटर्स या वृत्तसंस्‍थेला मुलाखत दिली होती. गुजरात दंगलीवेळी मी काहीही चुकीचे केलेले नाही, मी योग्यच निर्णय घेतले. मी हिंदू राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी असण्यात गैर काय?', असा सवाल मोदी यांनी त्‍या मुलाखतीत केला होता.

मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर काँग्रेससह सपा तसेच डाव्या पक्षांनी जोरदार टीका केली होती.

राहुल गांधीच होतील पंतप्रधान, बेनीप्रसाद वर्मा यांचा दावा... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...