आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 3 इंच झुकलेल्या चार मजली इमारतीस डायनामाईट लावून पाडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुकलेल्या इमारतीचा फोटो

भोपाळ - कमला पार्क येथील कल्लो बुवा मशिदीजवळ बुधवारी चार मजल्याच्या घर अचानक झुकल्याने परिसरात खळबळ उडाली. हे घर पडल्याने कोणतीही जीवीत हानी होऊ नये याकरीता स्थानिक प्रशासनाने हे घर गुरूवारी सकाळी पाच वाजता डायनामाईट लावून पाडले.
डायनामाईटचा झटका एवढा जोराचा होता की, त्यामुळे जवळपासच्या 5-6 घरांना भेगा पडल्या. या स्फोटाने आसपासच्या सर्वच भागात गोंधळ उडाला. बुधवारी ही इमारत झुकली होती, यातील पाच कुटुंबांना बाहेर काढण्यात आले

कमला पार्क येथील ही इमारत झुकल्याने आसपासचे सर्वच लोकांना भीती वाटायला लागली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना तसेच महानगर पालिकेला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून इमारतीत राहणार्‍या पाच कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच ही संपूर्ण इमारत खाली करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर इमारतीच्या आसपासच्या पाच घरांनाही खाली करण्यास सांगितले. त्यानंतर गुरूवारी पहाटे ही इमारत पाडण्यात आली.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इमारत झुकल्यानंतरचे फोटो...