आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Between India And Pakistan On August 15, Will Not Be Exchanged Sweets

स्‍वातंत्र दिनी भारत पाकिस्‍तानाला मिठाई देणारही नाही अन घेणारही नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - 15 ऑगस्‍टला भारताचा स्वातंत्र दिवस आणि 14 ऑगस्‍टला पाकिस्तानचा स्‍वातंत्र दिवस आहे. या दिवशी दरवर्षी भारताकडून पाकिस्‍तान सैन्‍याला सीमेवर मिठाई दिली आणि त्‍यांच्‍याकडून घेतली जाते. पण, यंदा भारत पाकिस्‍तनाला मिठाई देणारही नाही घेणारही नाही. या बाबत पंजाब फ्रंटियरचे आयजी अनिल पालीवाल म्‍हणाले, ''पंजाबमधील दीपानगरात झालेला हल्‍ला आणि जम्‍मू काश्‍मीरमध्‍ये सातत्‍याने होत असलेला गोळीबार यामुळे भारताने हा निर्णय घेतला आहे'', अशी माहिती त्‍यांनी दिली.
भारताची मिठाई स्‍वीकारली नाही
इदच्‍या पावनपर्वावर भारतकडून पाकिस्‍तानाकडे मिठाईचा प्रस्‍ताव ठेवला होता. पण, तो पाकिस्‍तानने नाकारला.
विशेष दिवशी दिली जाते मिठाई
भारतीय प्रजासत्‍ताक दिवस, होळी, दीपावली, इद, दोन्‍ही देशांचा स्‍वातंत्र दिवस अशा विशेष दिवशी बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून एकमेकांना मिठाई दिली जाते.
पाकिस्‍तानेही घेतली नाही आणि दिलीही नाही.
गतवर्षी ऑक्‍टोबर 2014 मध्‍ये साज-या झालेल्‍या बकरी इदला पाकिस्‍तानाने भारताला मिठाई दिलीही नव्‍हती आणि भारताकडून घेतलीही नव्‍हती. तेव्‍हापासून हा पायंडा मोडीत निघाला. पालीवाल यांनी सांगितले की, सीमेवर अतिरिक्‍त फोर्स तैनात केली गेली आणि कार्यालयात बसणा-या अधिका-यांनाही फील्डवर उतरवले गेले.
सलग चौथ्‍या दिवशी पाकिस्तानने तोडला सीजफायर
सलग चार दिवसांपासून पाकिस्‍तान सीजफायरचा भंग करत आहे. बुधवारीही सकाळी 10.15 वाजता जम्मू-कश्मीरच्‍या पुंछ जिल्‍ह्यात एलओसीजवळ भाजीबाजार परिसरात पाकिस्‍तानने आर्मी पोस्ट आणि सामान्‍य लोकांवर सकाळी रॉकेटने मारा केला.