आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावर पडलेला आई-बहिणीचा मृतदेह; चिमुरड्याच्या मदतीला कुणीही थांबले नाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- घाटमधील गुणी सुरंगच्या मार्गावर आई आणि सहा महिन्यांच्या बहिणीचा मृतदेह पडलेला. त्यांच्या शेजारी हबरडा फोडणारा अवघ्या पाच वर्षांचा चिमुरडा आणि वाहनचालकांना मदतीची याचणा करणारे त्याचे जखमी वडिलांच्या मदतीसाठी कोणीच थांबले नाही. कडाक्याचा उन्हाळ्यात तापलेला रस्ता. लोकांना विनवणी केली परंतु कुणालाच दया आली नाही. त्यात सुरंगमध्ये मोबाइल चालत नसल्याने अजमेर मार्गावरील भांकरोटा-ठीकरिया येथील रहिवासी कन्हैयालाल दुर्घटनेची माहिती कोणालाही देऊ शकला नाहे.

कन्हैयालाल कधी पत्नी गुड्डी (26) आणि सहा महिन्यांच्या आरुषीच्या मृतदेहाला बिलगायचा तर कधी जखमी तनीषला सावरायचा. तितक्यात काही मोटारसायकल सवार नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांना तत्काळ पोलिसांना सूचना दिली. पोलिसही घटनास्थळी पोहचले.

रविवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने कन्हैयालाल यांच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्यात त्यांची पत्नी गुड्डी आणि सहा महिन्यांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला होता. तर कन्हैयालाल आणि त्याचा पाच वर्षांचा तनीष जखमी झाला होता.