आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagwat Snubs Sakshi Said Our Mothers Are Not Baby Factories

आई ही मुले जन्माला घालण्याची फॅक्टरी नाही, RSS प्रमुखांनी फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी भाजप खासदार साक्षी महाराजांना हिंदु महिलांनी चार मुले जन्माला घालण्याच्या व्क्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये संघाच्या एका कार्यक्रमात साक्षी महाराजांचे नाव न घेता ते म्हणाले की, हिंदु माता म्हणजे काही फॅक्टरी नसून मुले जन्माला घालणे हा वैयक्तिक निर्णय आहे.

संघाशी संलग्न असलेल्या सुमारे 40 संघटनांच्या सुमारे 300 प्रतिनिधींना संबोधित करताना भागवत यांनी साक्षी महाराज आणि त्यांच्या वक्तव्याची पाठराखण करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत संदेश दिला. ते म्हणाले की, मी कोणाला काही बोलण्यापासून थांबवू शकत नाही, पण अशा गोष्टी बोलण्याआधी थोडाफार विचार करायला हवा. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, भागवत हे हिंदुंची लोकसंख्या कमी होत असल्याने निर्माण होणारे भौगोलिक असंतुलन आणि त्यामुळे राष्ट्रीय सुपक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत काहीही बोलले नाहीत. महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबतही भागवत यांनी वक्तव्य केले. देशात महिलांची लोकसंख्या अशून त्यानुसार त्यांना प्रतिनिधित्व मिळायला हवे असे ते म्हणाले आहेत.

मोदींचा बचाव, म्हणाले आम्हाला आमच्या स्वयंसेवकावर पूर्ण विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावेळी भागवत यांनी बाचव केला. मोदींमध्ये इच्छाशक्ती आहे, आणि आम्हाला आमच्या स्वयंसेवकावर पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करत असते. मीही पंतप्रधान बनलो तर तसेच काम करेन असेही ते म्हणाले. संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघाने सरकार दुर्लक्ष करत असल्याची तक्रार केली होती. त्यावर आपण आपले काम करत राहायला हवे, असे भागवत म्हणाले.