आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतरत्न बिस्मिल्लाह खाँ यांच्या पुरस्काराला वाळवी, बाळासाहेबांनी दिली होती मनापासून दाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतरत्न खाँ साहेबांच्या पुरस्काराला वाळवी लागलीये. - Divya Marathi
भारतरत्न खाँ साहेबांच्या पुरस्काराला वाळवी लागलीये.
वाराणसी - भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची 21 ऑगस्टला 11वी पुण्यतिथी आहे. शहनाई वादनात त्यांनी देशाचे नावलौकिक केले. वाराणसीच्या दालमंडीतील घरात आजही त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार ठेवलेला आहे, पण त्याला चक्क वाळवी लागलीये. divyamarathi.com आज तुम्हाला बिस्मिल्लाह खाँ यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीबाबत सांगत आहे.
 
आर्थिक परिस्थितीमुळे होत नाहीये खानसाहेबांच्या घरातील मुलींचे लग्न
- वाराणसीच्या दालमंडीमध्ये बिस्मिल्लाह खाँ यांचे वडिलोपार्जित घर आहे. येथे आजही त्यांचे कुटुंब राहते. त्यांचा लहान मुलगा नाझिम म्हणतो, अब्बा गेल्यानंतर सर्वकाही बदलले. आता आम्हाला कोणी विचारत नाही. आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे.
- रेडिओमध्ये मान्यताप्राप्त असूनही 5 वर्षांपासून रेडिओ एकही प्रोग्राम मिळालेला नाही. घरातल्या मुलींचे लग्न होत नाहीये. लोक समजतात की, बिस्मिल्लाह खाँचा मुलगा आहे, खूप पैसा असेल. मोठे भाऊ जामिन हुसेन शहनाई वादन करतात, ते आजारी आहेत. त्यांचा इलाजही नीट होत नाहीये.
-नातू नासिर म्हणाला, घराची अशी परिस्थिती आहे की, आम्हाला जगायचे कसे हा प्रश्नच पडलाय! वर्षभरात एक वा दोन प्रोग्राम होतात. तो पैसा एकाच महिन्यात संपून जातो.
- आजोबांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता, पण आज त्याची काहीच किंमत नाहीये. त्याला वाळवी लागलीये. त्यांच्या खोलीत आजही त्यांचे जोडे, छत्री, टेलिफोन, खुर्ची, लॅम्प आणि भांडी ठेवलेली आहेत.
- नाझिम म्हणाले, लहानपणी अब्बांना भेटायला अमेरिकी व्यापारी काशीला आला होता. तो अब्बांना म्हणाला होता की, जितके पाहिजे तितके पैसे घ्या, पण माझ्यासोबत अमेरिकेत चला. अब्बा म्हणाले होते, मला तिथे गंगामाई भेटेल का? गंगेलाही घेऊन चला, तरच येतो!
 
असे होते बिस्मिल्लाह खाँ
- 21 मार्च 1916 ला बक्सर जिल्ह्याच्या डुमरांव राजच्या बक्श मियाँ यांच्या घरी जन्मलेले कमरुद्दीन पुढे चालून उस्ताद बिस्मिल्लाह खान बनले. शहनाईची आवड पाहून वडिलांनी त्यांना मामू अली बक्श यांच्याकडे बनारसला पाठवले.
- साधारण शहनाईवर शास्त्रीय धून वाजवून बिस्मिल्लाह खान यांनी पूर्ण जगात ठसा उमटवला. सर्वात आधी 1930 मध्ये इलाहाबादमध्ये त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला होता.
- खाँ साहेबांचे गंगा आणि काशी विश्वनाथाशी दृढ नाते होते. म्हणूनच त्यांनी कधीच काशी सोडली नाही. इंदिरा गांधी शहनाई ऐकण्यासाठी त्यांना आमंत्रित करायच्या. राजकीय नेतेच नाही तर सिनेअभिनेतेही त्यांचे चाहते होते.
- स्व. राजीव गांधींनी एकदा त्यांना दिल्लीला बोलावले आणि अनेक तास सोनिया गांधींसह त्यांची शहनाई ऐकली. एवढेच नाही, एकदा तर मुंबईत खान साहेबांची भेट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झाली.
- बाळासाहेबांनी त्यांना शहनाईच्या धुनमध्ये बधैया ऐकवण्याचा आग्रह केला. यानंतर तब्बल 40 मिनिटे त्यांनी अशी काही शहनाईची तान छेडली की, बाळासाहेबांवरही खाँसाहेबांची अमिट छाप पडली.
 
कोण-कोणते अवॉर्ड मिळाले?
संगीत नाट्य अकादमी पुरस्कार: 1956
पद्मविभूषण : 1968
पद्मभूषण : 1980
तराल मौसकि: 1992
भारतरत्न: 2001
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, खाँसाहेबांचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...