आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतरत्न दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या पाच सनया चाेरीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- भारतरत्न दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या अत्यंत मौल्यवान पाच सनया मुलगा काझिम हुसैन यांच्या घरातून चाेरीस गेल्या आहेत. काझिम वाराणसीच्या चौक भागात राहतात. काझिम यांनी रविवारी रात्री सनई चोरीची तक्रार दिली होती. सनई वाद्याशिवाय लाखो रुपये किमतीचे दागिने व चांद्याच्या प्लेट्सचीही चोरी झाली. संबंधित सनईच्या माध्यमातून बिस्मिल्ला खान मोहरमच्या पाचव्या व आठव्या तारखेस कार्यक्रम सादर करत होते. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याकडून भेट स्वरूपात दिलेल्या चांदीच्या सनया हरवल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...