आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीसह सर्व मर्जीने झाले: बलात्काराचा आरोपी जैन मुनी म्हणाला; कोर्टाने तुरुंगात केली रवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - 19 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा आरोपी जैन मुनी शांतीसागर (49) यांनी दावा केला आहे की, त्यांना फसवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना ते म्हणाले की, मी तरुणीला 5-6 महिन्यांपासून ओळखतो. ती पहिल्यांदाच भेटण्यासाठी सहकुटुंब सुरतला आली होती.
>टीमलियावाड नानपुरा धर्मशाळेत तरुणीच्या सहमतीने 1 ऑक्टोबरला संबंध बनवले. जीवनात पहिल्यांदा असे केले. हे बाब डॉक्टरांनी मेडिको लीगल केस रजिस्टरमध्ये नोंदवली आहे. डॉक्टरांनी मुनीला विचारले- तुम्ही साधू आहात, असे का केले? यावर मुनींनी मान खाली घातली. यानंतर मुनींना तुरुंगात पाठवण्यात आले. 
 
दिगंबर संताला कपडे घालून आणले पोलिसांनी
- शनिवारी रात्री अटकेनंतर 10 ते 11.45 पर्यंत मुनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यादरम्यान आवश्यक सॅम्पल घेतले जाऊ शकले नाही. डॉक्टर म्हणाले की, मुनी तणावात आहे. पोलिसांनी त्यांना तपासण्यासाठी पुन्हा घेऊन यावे.
- सूत्रांनुसार, हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिस फॉरेन्सिक तपास करण्याचाही तपास करत आहेत. शांतिसागरला पोलिसांनी शनिवारी रात्री ड्यूटी मॅजिस्ट्रेटसमोर सादर केले, परंतु कोठडी मागण्यात आली नाही. पोलिसांनी कोणतेही सामान जप्त न केल्याचे म्हटले आहे.
- कोर्टातून न्यायालयीन कोठडी दिली गेल्यानंतर 12.35 वाजता मुनीला तुरुंगात पाठवण्यात आले.
- इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर डी. के. राठोड म्हणाले की, चार साक्षीदारांनी या केसमध्ये जबाब दिले आहेत. चौघांचा दावा आहे की, आचार्याच्या उपस्थितीत तेही तेथे होते. 
- शांतीसागर दिगंबर जैन संत आहेत. अशा संतांनी वस्त्रांचा त्याग केलेला असतो, परंतु अटकेनंतर मेडिकल तसेच कोर्टात पेशी आणि तुरुंगात पाठवताना त्यांना कपडे घालण्यात आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...