आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूपुर म्हणाल्या: जग अामच्याकडे संशयानेच पाहतेय, पण तुरुंगातील लाेकांनी साथ दिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाेएडा- सायंकाळी साडेपाचची वेळ. नाेएडा सेक्टर २५  जलवायू विहारमधील एल- २४५ मध्ये नूपुरची अाई लता चिटणीस, राजेश तलवार यांचे छाेटे भाऊ डाॅ. दिनेश तलवार, त्यांच्या पत्नी वंदना अाणि इतर लाेक जेलमधून सुटून येणाऱ्या तलवार दांपत्याची प्रतीक्षा करत हाेते. सर्वांच्या चेहऱ्यावर अानंद अाणि अस्वस्थता हाेती.  ठीक सहा वाजता राजेश व नूपुर तिथे पाेहाेचले.
 
एकमेकांना पाहून सर्व कुटुंबीयांच्या डाेळ्यात अश्रू अाले. लता चिटणीस यांनी दाेघांचे अाैक्षण केले अाणि मिठाईने ताेंड गाेड केले. सर्व जण घरात गेले, काही वेळ सर्वच जण नि:शब्द हाेते. काय बाेलावे काेणाला काहीच उमजेना. सुमारे १५ मिनिटे ही शांतता हाेती. त्यानंतर लता यांनी नूपुरला विचारले, ‘कशी अाहेस? अाम्ही सगळे तुमच्या साेबत अाहाेत, अाता काहीही त्रास हाेणार नाही.’ 
काही वेळाने नूपुरसाेबत तुरुंगात राहिलेल्या प्रियंकाने त्यांची गळाभेट घेतली. दाेघीही रडू लागल्या. त्याच वेळी डाॅ. दिनेश म्हणाले, ‘घरासमाेर माध्यमांचे प्रतिनिधी जमले अाहेत, त्यांच्याशी काेण बाेलणार? ’ राजेश अाणि नूपुर म्हणाले, ‘अाम्ही तर बाेलू शकत नाही.’ त्यावर दिनेश बाहेर अाले अाणि त्यांनी सर्वांना परिस्थिती समजून सांगत परत पाठवले. याच दरम्यान देश-विदेशातून फाेन येत हाेते. अारुषीचे अाजाेबा बी.जी. चिटणीस सर्वांशी बाेलत हाेते. याच दरम्यान नूपुरने अाईच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट माेकळी करून दिली. नंतर म्हणाल्या, ‘चार वर्षे फार जड गेली. जेलमधील महिला, मुलांसाेबत दिवस कटायचा, परंतु रात्री फक्त अारुषींच्या अाठवणींचाच सहारा असायचा....’ 

एका नातेवाइकाने विचारले, ‘अाता पुढे काय?’ त्यावर राजेश म्हणाले, ‘अजून काही विचार केला नाही. पण अाता मन:शांती हवीय. अारुषीच्या स्मृतीत काही तरी करायचंय...’ तुरुंगातील अाठवणी सांगताना नूपुर म्हणाल्या, ‘जगभरातील लाेक अामच्याकडे संशयानेच पाहत असतील. परंतु जेलमध्ये त्याची जाणीव कधीही झाली नाही. तेथील लाेक सर्वच परिस्थितीत साेबत हाेते...’ डाॅ. दिनेश म्हणाले, ‘अाता तुम्ही अालात, दिवाळी अानंदाने साजरी करू.’ त्यावर राजेश म्हणाले, ‘तुरुंगातील सर्व जण जणू कुटुंबातील सदस्यच बनले हाेते. परंतु प्रत्येक सणासुदीला अारुषीची अाठवण येत हाेती.’ त्यावर लता म्हणाल्या.. ‘चला काही तरी खाऊन घ्या... अाम्ही तुमच्या अावडीची खीर व मालपुअा बनवले अाहेत...!’
 
कैद्यांच्या कल्याणासाठी दान केली तुरुंगातील कमाई
मुलगी आरुषी व घरगडी हेमराजच्या हत्येच्या आरोपात निर्दाेष ठरलेले डेंटिस्ट दांपत्य राजेश तलवार व नूपुर तलवार यांची सोमवारी चार वर्षांनंतर दासना तुरुंगातून सुटका झाली. सुटका होताना त्यांनी कैद्यांवर केलेल्या उपचारापोटी मिळालेले सुमारे ५० हजार रुपये मानधन कैद्यांच्या कल्याणासाठी दान केले.
बातम्या आणखी आहेत...