आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांच्या बाहुपाशात नशा करत होते तरुण-तरुणी, कॅमेरा पाहून असे लपवले चेहरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - बुधवारी भास्कर टीम पोलिसांसह अशा जागी गेली, ज्यांच्याबाबत सर्व्हेमध्ये मुलांनी सांगितले होते. या जागांवर विना लायसेन्स हुक्का बार संचालित होताना आढळले. येथे अनेक तरुण-तरुणी नशेत धुंद असलेले आढळले. पोलिसांना पाहून अनेक जण आपले करिअर बरबाद होईल असे करू नका हे म्हणू लागले. यादरम्यान हुक्का बार संचालकाने भास्कर टीमसोबत बाचाबाची केली आणि कॅमेरा हिसकावण्याचाही प्रयत्न केला. परंतु पोलिस सोबत असल्याने त्याला यश आले नाही.
 
एकमेकांच्या बाहुपाशात हक्का ओढत होते तरुण-तरुणी...
- सरदारपुराच्या शनिश्वरजी रोडवर एका नर्सिंग कॉलेजच्या छतावर झोपडीवजा स्ट्रक्चरमध्ये शामियाना नावाने हुक्का बार सुरू होता. येथे काही तरुण-तरुणी एकमेकांच्या बाहुपाशात हुक्का ओढत होते.
- जेव्हा टीमने फोटो घेतले तेव्हा एका गार्डने भास्करच्या फोटो जर्नालिस्टला पकडले. एवढ्यात सरदारपुरा पोलिसांची टीम आली आणि तरुण-तरुणींनी जमिनीकडे तोंड वळवून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करायला लागले. यात दोन तरुणी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. त्यांना ताकीद देऊन सोडून देण्यात आले.
 
नशा करण्यासाठी आलेल्या तरुणींना बाहेरूनच कटवले
- भास्कर टीम पोलिसांसह सरदारपुरा सी रोडवर आझाद हिंद कॉलेजसमोरच्या एका बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का बार "द क्यूब"वर पोहोचली. येथे कोणीही नशा करताना आढळले नाही, परंतु दोन तरुणी हुक्का ओढायला आल्या तेव्हा बार मालकाने बाहेरूनच इशाऱ्याने जायला सांगितले. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...