आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Year स्पेशल : कोण जिंकणार UPचे युद्ध, \'कटप्पा\' ने बाहुबलीला का मारले हेही समजेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2017 चे आगमन झाले आहे. लोकांना तर यंदा अनेक अपेक्षा आहेतच पण त्याचबरोबर मोदी सरकारची त्यांच्या नव्या जुन्या योजनांचा जनतेवर कसा प्रभाव होतो हे पाहण्यास उत्सुक आहे. या वर्षी जीएसटी लागू झाल्याने जीडीपीत वाढीची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा व्यापक परिणामही नव्या आर्थिक वर्षात दिसेल. अर्थव्यवस्थेबरोबरच लोकांची नजर सात राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही असेल. विशेषतः देशातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तरप्रदेशावर सगळ्यांची नजर असेल. भाजपला नोटबंदीचा फटका बसणार की सत्ताधारी सपाला कौटुंबीक कलह भोवणार हे जनता या निवडणुकीत दाखवून देईल. यंदा प्रथमच रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्र सादर होईल. चित्रपट आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातही यंदा गगन भरारी पाहायला मिळू शकते. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, नवीन वर्षात काय होणार कोणाला मिळणार कोणता आनंद...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...