आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhaskar's First Dwarka Prasad Agarwal Award To Prabhat Ranjan

रंजन यांना भास्करचा पहिला द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभात रंजन (डावीकडून दुसरे) यांना एक लाख रुपये रोख व प्रशस्तिपत्र प्रदान करताना भास्कर समूहाचे ब्रँड मार्केटिंग असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट विकास सिंह, राजस्थानचे संपादकीय स्टेट हेड लक्ष्मीप्रसाद पंत व  फेस्टिव्हलच्या सहसंस्थापक नमिता गोखले. - Divya Marathi
प्रभात रंजन (डावीकडून दुसरे) यांना एक लाख रुपये रोख व प्रशस्तिपत्र प्रदान करताना भास्कर समूहाचे ब्रँड मार्केटिंग असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट विकास सिंह, राजस्थानचे संपादकीय स्टेट हेड लक्ष्मीप्रसाद पंत व फेस्टिव्हलच्या सहसंस्थापक नमिता गोखले.
जयपूर - दैनिक भास्कर समूहातर्फे जाहीर झालेला पहिला द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कार रविवारी हिंदीतील तरुण साहित्यकार प्रभात रंजन यांना त्यांच्या "कोठागाई' या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान हॉटेल फ्रंट लोनमध्ये हा सोहळा पार पडला. या पुरस्काराचा उद्देश हिंदी भाषेला नवी ओळख देण्यासोबतच हिंदी साहित्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणे हा आहे. त्यासाठी दैनिक भास्करच्या वतीने लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी भास्कर सिरीजचेही आयोजन करण्यात येते. आता द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कारही दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे.
हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदी लेखन स्पर्धा दरवर्षी लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान घेतली जाते. या स्पर्धेतील विजेत्यांना दरवर्षी जगभरातील दिग्गज साहित्यिक, लेखकांना भेटण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून िदली जाते. उल्लेखनीय बाब अशी की प्रभात रंजन हेही तरुण साहित्यिक आहेत. त्यांचे पुस्तक "कोठागाई' हिंदीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. त्याशिवाय त्यांच्या "जानकी पूल', "बोलेरो क्लास' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते दिल्लीच्या झाकीर हुसेन नाइट महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांना २००६ मध्ये प्रेमचंद पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.