आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhawartratan Awardee Rao Said Political Leaders Are Idiot

शास्त्रज्ञांना मिळणा-या निधीवरून भारतरत्न राव संतापून म्हणाले, राजकीय नेते इडियट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - भारतरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले शास्त्रज्ञ सीएनआर राव यांनी रविवारी संतापाच्या भरात राजकीय नेत्यांना इडियट संबोधले. वैज्ञानिकांना मिळणा-या निधीच्या मुद्द्यावर ते बोलत होते. हा निधी अपुरा असल्याचे मत त्यांनी मांडले.
पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असलेले राव पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकार वैज्ञानिकांना जेवढा पैसा देते त्या तुलनेत आम्ही अधिक चांगले काम केले आहे. पण हे इडियट नेते तरीदेखील आम्हाला कमी पैसे का देतात? आमच्यावरील गुंतवणूक खूपच कमी आहे. उशिराने पैसा मिळतो. ज्यासाठी पैसे मिळाले, त्यात आम्ही कामगिरी करून दाखवली.
चीनच्या प्रगतीवर राव म्हणाले, याचा दोष आम्ही स्वत:वर घेतला पाहिजे. आम्ही कठोर परिश्रम करत नाहीत. चिनी लोकांप्रमाणे आम्ही नाहीत. आम्हाला सगळे सहजगत्या हवे असते. आम्ही त्यांच्याएवढे राष्‍ट्रवादी नाहीत. थोडा जास्त पैसा मिळाला की आम्ही परदेशात पळण्यासाठी तयार होतो.