आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडला गाडून प्रेयसीने कबरीवर उगवली कोबी, 44 दिवसांनी झाला कटाचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी किस्मी जैन. - Divya Marathi
आरोपी किस्मी जैन.
भिलाई - धान्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगडमध्ये अशी काही निर्घृण प्रकरणे उजेडात येतात ज्यामुळे देशभरात खळबळ उडते. याच वर्षी घडलेले भोपाळच्या उदयनचे प्रकरण सर्वांना हादरवून गेले. त्याने आपल्या आईवडिलांना मारून रायपूरच्या आपल्या घरातील अंगणात गाडले होते. असेच एक प्रकरण दोन वर्षांआधी समोर आले जेव्हा एका प्रेयसीने रायपुरात आपल्या माजी प्रियकराचा चाकूने भोसकून खून केला. एवढेच नाही, तर आरोपी महिलेने मृतदेहाला घराच्या अंगणात गाडून त्यावर कोबी पिकवली. हा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे.
divyamarathi.com आपल्या क्राइम सिरीजमध्ये या खळबळजनक प्रकरणाबद्दल सांगत आहे. 
 
44 दिवसांनी उलगडले अपहरणाचे रहस्य...
- वास्तविक, छत्तीसगडच्या शंकरा ग्रुप ऑफ कॉलेजचे संचालक अभिषेक मिश्रा 9 नोव्हेंबर 2015 ला अचानक बेपत्ता झाले होते.
- त्यांची कार रायपूर एअरपोर्टवर बेवारस अवस्थेत आढळली होती आणि फोनही बंद होता.
- इकडे पोलिसांनी अपहरणाच्या शंकेने चौकशी सुरू केली. बालोदा बाजारात एक मुंडके नसलेला मृतदेह मिळाल्यावर त्याची डीएनए टेस्ट करण्यात आली. पण तो दुसऱ्याचाच निघाला.
- इकडे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांना दिशानिर्देश दिले.
 
असा आढळला मृतदेह
- पोलिसांनी तब्बल 1500 लोकांची चौकशी करून 1872 कॉल डिटेल्सही तपासल्या.
- पैकी एक मोबाइल नंबर किस्मी जैन नावाच्या महिलेचा आढळला. किस्मी उद्योजक विकास जैन यांची वाइफ आहे.
- किस्मी पूर्वी अभिषेकच्या ग्रुपमध्ये काम करायची. पोलिसांना दोघांच्या अफेअरचा सुगावा लागला.
 
किस्मीच्या घरच्या गार्डनमध्ये मृतदेह आढळला
- चौकशीनंतर पोलिसांनी तपास केल्यावर मृतदेह किस्मीच्या घरातील गार्डनमध्ये आढळला. मृतदेह दफन करून त्यावर फुलकोबीचे रोपटे लावण्यात आले होते. 
- मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा अगोदरच तयार होता. शेजाऱ्यांनी खड्ड्याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना कंपोस्ट खतासाठी खड्डा केल्याचे सांगितले.
 
अशी आहे निर्घृण खुनाची पूर्ण कहाणी...
-अभिषेक 200 कोटींच्या शंकरा ग्रुप ऑफ ऑफ कॉलेजमध्ये संचालक होता आणि छत्तीसगडी सिनेमे प्रोड्युस करत होता.
अभिषेकच्या कॉलेजमध्ये किस्मी काम करायची. त्याच वेळी दोघांचे अफेअर झाले. इकडे किस्मीचे लग्न एका उद्योजक विकास जैनशी झाले.
- अभिषेकही लग्न करून सेटल झाला. किस्मीने पोलिसांना सांगितले की, अभिषेक जुन्या संबंधांच्या आधारे मला ब्लॅकमेल करत होता. पुन्हा संबंध बनवण्यासाठी दबाव टाकत होता.
- ही गोष्ट किस्मीने तिचा नवरा विकासला सांगितली. विकासने अभिषेकला बऱ्याचदा समजावले, पण त्याने ऐकले नाही.
- इकडे अभिषेकच्या बायकोने हे सर्व खोटे असल्याचे सांगून तिचा नवरा तशातला नसल्याचे सांगितले.
 
असा रचला कट
- विकासने त्याचे काका अजित जैन आणि पत्नी किस्मीसह अभिषेकला मारण्याचा कट रचला.
- कटानुसार, पूर्ण प्रकरणाला नक्षली रंग द्यायचा होता. कटानुसार किस्मीने विकासच्या म्हणण्यावर अभिषेकला 9 नोव्हेंबरला आपल्या फ्लॅटवर भेटायला बोलावले. अभिषेक घरी कुणाला काहीही न सांगता तिथे गेला.
- तिथे हजर असलेल्या विकासने रॉडने अभिषेकच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. खुनानंतर विकासने आपल्या सासरवाडीतच गार्डनमध्ये त्याला दफन केले. आणि किस्मीने कबरीवर कोबीचे रोप लावले. 
- विकास अभिषेकची कार घेऊन आपल्या मित्रासह रायपूर एअरपोर्ट रोडवर सोडून पळाला.
- इकडे अभिषेकच्या घरी खंडणीसाठी फोन आला आणि फोन करणाऱ्याने 'लाल सलाम' म्हटले. ज्यामुळे पोलिसांचा संशय नक्षल्यांकडे जाईल.
 
प्रकरणाचे करंट स्टेटस
- सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. आरोपी जेलमध्ये आहे आणि ट्रायल सुरू आहे.
- आरोपींवर आतापर्यंत आरोपनिश्चिती झालेली नाही.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, प्रकरणाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...