थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार जॅकेट तुम्ही वापरले असेल. पावसात भिजल्यामुळे आजारी पडणार नाही यासाठी आपण छत्री किंवा रेनकोट वापरतो. भिजल्यामुळे थंडीताप येते. आजारी पडल्यानंतर जॉकेट घातल्या नंतर लेगेच आजार बरा होईल, असे एखादे जॉकेट तुम्हाला मिळाले तर किती आनंद होईल. ताप आल्यानंतर काही मिनिटामध्ये शरीरातील ताप कमी होण्याचे जॅकेट आता तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे जॅकेट घातल्यानंतर कितीही ताप आला असला तरी, 15 मिनिटामध्ये शरीरातील ताप कमी होणार आहे.
हे जॉकेट तयार केले आहे श्री शंकराचार्य इंस्टिट्यूट ऑफ़ इंजीनियरिंग अन्ड टेक्नोलॉजी दुर्ग येथील पंकज अग्रवाल यांनी हे जाॅकेट तयार केले आहे. ताप आल्यानंतर हे जॉकेट शरीरावर चढवले तर 2 ते 3 डिग्री सेल्शीयस ताप लगेच कमी होतो. जॉकेट तयार करण्यासाठी फ्रीजची पद्धत वापरण्यात आली असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. जॉकेट तयार करण्यासाठी फक्त 10 हजार रूपये खर्च लागतो. इतर आजार मात्र या जॉकेटमुळे बरे होणार नाहीत.
काय आहेत रूग्णाचे फायदे-
1- ताप आलेल्या रूग्णाचा स्पंजींगपासून बचाव होतो.
2- ताप कमी करण्यासाठी डोक्यावर ओली पट्टी बाधण्याची गरज नाही.
3- उघड्या शरिरावर हे जॉकेट घालता येते.
4- मशीन ऑपरेट करण्ो सोपे आहे.
कशी सुचली कल्पना-
प्रा. आग्रवाल म्हणाले की, मी बारा वर्षापासून एसी आणि फ्रीजचा अभ्यास करत आहे. काही दिवसापुर्वी मला ताप आल्यानंतर अशा प्रकारचे जॉकट तयार करण्याची कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा जॉकेटच्या वापराविषयी...