आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhimsen Joshi’S Heirs Vie For His Riches In High Court

\'भारतरत्न\' भीमसेन जोशी यांच्या संपत्तीचा वाद कोर्टात; जोशी यांची 10 कोटींची संपत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः भारतरत्न पं. भीमसेन जोशी)

मुंबई - भारतरत्न पुरस्काराने सन्मानित दिवंगत शास्त्रीय गायक पंडीत भीमसेन जोशी यांच्या संपत्तीवरून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू झाला आहे. पंडीतजींच्या या संपत्तीवरून त्यांचे पुत्र आता न्यायालयात पोहोचले. भीमसेन यांची जवळपास 10 कोटींची संपत्ती आहे, ज्यामध्ये जवळपास 20 संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचा समावेश आहे.
जोशी यांची संपत्तीचा हा वाद आता मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. पंडीत भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांची 3 मुले यांनी मागील वर्षाच्या सप्टेंबरमध्ये पुणे कोर्टाने दिलेल्या निकालाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. पुणे कोर्टाच्या निर्णयात पंडीत जोशी यांच्या पुण्यात असलेला बंगला 'कलाश्री' आणि इतर 2 फ्लॅटमध्ये या तिघांनाही कोण्या तिसर्‍या व्यक्तीला अधिकार देण्यास मनाई करण्यात आली होती.

पहिल्या पत्नीचा मुलगा राघवेंद्रने दिले आव्हान
पंडीत जोशी यांच्या पहिल्या पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी दाखल केलेल्या खटल्यात हा निर्णय देण्यात आला. राघवेंद्र यांनी जानेवारी 2011 मध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या निधनाच्या काही दिवसानंतर 22 सप्टेंबर 2008 या तारखेला बनवण्यात आलेल्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले होते.
पंडीत जोशी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता
जोशी यांनी दुसरे लग्न केले तेव्हा हिंदू लग्न कायदा 1956 अजून बनवण्यात आला नव्हता. तसेच जोशी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. याबदल्यात जोशी यांनी वत्सला आणि त्यांच्या मुलांना पुण्यातील बंगला, फ्लॅट आणि पुढील 50 वर्षांपर्यंत संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचे हक्क दिले होते. तर पहिली पत्नी सुनंदा आणि त्यांच्या चार मुलांच्या नावावर 20 लाख रुपयांची बँकेतील रक्कम केली होती. पंडीतजी आपल्या दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांच्या मुलांसोबत 'कलाश्री'मध्ये राहत होते. वत्सला स्वतःसुध्दा शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचे निधन 2005 मध्ये झाले होते. त्यांच्या निधनानंतर जोशी यांनी आपला बंगला कलाश्रीचे मालकी हक्क मुलगी सुभदा आणि मुलगा जयंत याच्या पत्नीकडे सोपवले होते. त्याच बरोबर इतर दोन फ्लॅट आपला मुलगा श्रीनिवास आणि त्याच्या पत्नीच्या नावावर केले होते.
पुढे वाचा... पंडीत जोशी यांची संपत्ती आणि कसे आहे त्यांचे कुटुंब