आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू : भिंडरावालेचे पोस्टर उतरवल्याचा तीव्र विरोध, कर्फ्यूमध्ये जाळपोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मूमध्ये जरनेलसिंग भिंडरावालेचे पोस्टर उतरवल्यानंतर भडकलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. शुक्रवारी शीख समाजाने बंदचे आवाहन केले आहे. त्यांनी जम्मू-पठाणकोट हायवेवर चक्काजाम केला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
गुरुवारी कठुआ येथे आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत वाहतूक रोखून धरली होती. शीखांच्या उग्र अंदोलनानंतर जम्मू जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी रिफत कोहली म्हणाले, 'दंगलखोरांना रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. या भागात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. लष्काराने सकाळी फ्लॅगमार्च केला. आज या भागातील शाळा, महाविद्यालये आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.'
अशी भडकली हिंसा
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृतिदिनानिमीत्त 6 जून रोजी सिंबल कँप येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमीत्त अनेकभागात भिंडरावालेची छायाचित्रे असलेले पोस्टर, बॅनर लावण्यात आले होते. बुधवारी पोलिसांनी त्यावर कारवाई करत पोस्टर आणि बॅनर काढून टाकले. त्याविरोधात राणीबाग भागात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्याने त्यांना हटवण्यासाठी पोलिस बल बोलावण्यात आले. तेव्हा आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला केला.
गुरुवारी सकाळी पुन्हा पोस्टर लावण्यात आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ते काढून टाकले. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज, अश्रूधुरांचे नळकांडे फोडून आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी फायरिंग केली. जगजितसिंह या आंदोलकाच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक जखमी झाले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आंदोलकांची छायाचित्रे
(फोटोग्राफर - अंकुर सेठी)