पाटणा - बालपणी यांना खरेदी करण्यासाठी सर्कशीतील लोक आले होते. मात्र वडिलांनी साफ नकार दिला, यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. तरुण झाल्यानंतर अनेक संकटांचा सामना करावा लागला. लग्नाची वेळ आली... मुलीच्या नातेवाईकांनी ऐनवेळी नकार कळविला. मुलीने मात्र लग्न करणार तर यांच्यासोबतच अशी ठाम भूमिका घेतली तेव्हा नवरदेव होऊन मुलीच्या दारात वरात आणली मात्र मनात धाकधूक होतीच.
भीतीमुळे मंदिरात केले लग्न
- के.के. गोस्वामीची उंची कमी असतानाही त्यांच्या भावी पत्नीने होकार कळविला होता. नातेवाईक तिला समजावत होते की अजूनही वेळ आहे पुन्हा विचार कर. तूला चांगला मुलगा मिळेल, घाई करु नको. मात्र तिने ठामपणे सांगितले लग्न ठरले तेव्हाच मी त्यांना मनोमन पती मानले आहे आता दुसरा विचार नाही. ते बुटके असले म्हणून काय झाले, लग्न करणार तर केकेसोबतच.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)