Home »National »Other State» Bhojpuri Film Actress Mohini Ghosh Life Story

भोजपुरी अॅक्ट्रेस म्हणाली- जीव ओतून काम केलेय, चित्रपटासाठी दिले एवढे बोल्ड सीन

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 01:00 AM IST

  • मोहिनी घोषने चित्रपटासाठी अनेक बोल्ड सीन दिले.
पाटणा - भोजपुरी अभिनेत्री मोहिनी घोष आपल्या नवीन चित्रपट जिला चंपारणच्या प्रमोशनसाठी सध्या पटनासह बिहारमधील इतर जिल्ह्यांचा दौरा करत आहे. या चित्रपटात मोहिनीने पम्मी या पात्राची भूमिका साकारली आहे. पम्मी लहानपणापासूनच अभिनेता खेसारीलाल यादवच्या प्रेमात असते. चित्रपटात मोहिनी घोषने अभिनेता खेसारीलाल यादवसोबत अनेक बोल्ड सीन केले आहेत.
बिहारींमुळेच भोजपुरीची ओढ
-कोलकात्याच्या मोहिनीने सांगितले की लहानपणापासूनच तिला बिहार आणि भोजपुरीसोबत ओढ आहे. कोलकातामधील माझ्या घराजवळ भोजपुरी लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच मला भोजपुरी इंडस्ट्रीत काम करणे आवडते.
-ती म्हणाली, भोजपुरी आज देशात भाषा म्हणून नावारूपाला येत आहे. देशात भोजपुरी बोलणारे व समजणारे बहुसंख्य आहेत. माझी अभिनय कला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच मी या इंडस्ट्रीची निवड केली.
- चित्रपटाविषयी मोहिनीने सांगितले की, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून त्यामुळेच यात जीव ओतून मेहनत करावी लागली. चित्रपटात माझी भूमिका पम्मी नावाच्या मुलीची असून ती लहानपणापासूनच खेसारीलालच्या एकतर्फी प्रेमात वेडी झालेली असते. या प्रेमात पुढे कोणता ट्विस्ट येतो हे चित्रपट पाहूनच कळले.
- अशी भूमिका करणे सोपे बिलकुल नाही. एका कलाकाराच्या रूपात अशा भूमिका आपल्याला जागृत करतात. माझ्या मते, एक खरा कलाकार तोच असतो जो कठीण प्रसंगांचा सामना करून आपली भूमिका जिवंत करतो.
- मोहिनी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील असून आतापर्यंत अनेक चित्रपटांत तिने काम केले आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भोजपुरी अॅक्ट्रेस मोहिनीच्या चित्रपटातील काही प्रसंगांचे फोटोज...

Next Article

Recommended