आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भोजपुरी स्टारचा फिल्मच्या नफ्यात असतो वाटा, प्रियंका चोप्राच्या निर्मीतीत करतोय काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव \'निरहुआ\' आणि अॅक्ट्रेस आम्रपाली दुबे यांचा \'बम-बम बोल रहा है काशी\' हा चित्रपट नुकताच रिलिज झाला. - Divya Marathi
भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव \'निरहुआ\' आणि अॅक्ट्रेस आम्रपाली दुबे यांचा \'बम-बम बोल रहा है काशी\' हा चित्रपट नुकताच रिलिज झाला.
पाटणा - भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव 'निरहुआ' आणि अॅक्ट्रेस आम्रपाली दुबे यांचा 'बम-बम बोल रहा है काशी' हा चित्रपट नुकताच रिलिज झाला. निरहुआ आणि आम्रपाली यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. दिनेश लाल एका चित्रपटासाठी 40-45 लाख रुपये घेतो आणि त्यासोबतच नफ्यात त्याचा शेअर असतो. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातील दिनेश आज भोजपुरी चित्रपटामुळे बिहारमधी सर्वात पॉपुलर स्टार आहे.

दिनेश लालने नावासोबत का जोडले 'निरहुआ'
- बम-बम बोल रहा है काशी या चित्रपटाची निर्मीती बॉलिवूड स्टार प्रियंका चोप्राने केली आहे.
- एका मुलाखतीत दिनेशने सांगितले, की माझ्या एका अल्बमचे नाव 'निरहुआ सटल रहे' होते. त्यानंतर लोक मलाही 'निरहुआ' म्हणायला लागले.
- दिनेश लालने सांगितले की त्याचा पहिला चित्रपट 'चलत मुसाफिर मोह लियो रे' च्या शुटिंग दरम्यानही लोक मला 'निरहुआ' नावानेच ओळखत होते.
- लोक जेव्हा ऑटोग्राफ घेण्यासाठी येतात आणि मी दिनेश लाल लिहितो तेव्हा त्यांची इच्छा असते की मी 'निरहुआ' लिहावे.
- दिनेश त्याचा अल्बम 'निरहुआ सटल रहे' हा त्याच्या लाइफमधील टर्निंग पाँइंट असल्याचे मानतो.

गाणे पाठ नसेल तर वडिल रागवत
- दिनेशने एका मुलाखतीत सांगितले की आज मी जो काही आहे त्याचे संपूर्ण श्रेय वडिलांना आहे. कारण त्यांना माहित होते की मी काय करु शकतो.
- दिनेश लाल सांगतो की सर्वांचे वडील अभ्यास केला नाही म्हणून त्यांच्यावर चिडतात मात्र माझे वडील मी गाणे पाठ केले नाही तर माझ्यावर चिडत होते.
- दिनेशने सांगितले की जेव्हा माझा शो चालत नव्हता आणि मी सिंगिंग सोडण्याचा विचार केला होता. तेव्हा वडिलांनी मला मोठा आधार दिला.
- त्यांचा सपोर्ट नसता तर आज मी येथे नसतो.

पुढील स्लाइडमध्ये
> वडीलांना होता 3500 हजार रुपये पगार
> निरहुआला कशाचा आहे अभिमान...
> अल्बम 'निरहुआ सटल रहे' ठरला टर्निंग पाँइंट
> पाहा, 'निरहुआ'चे निवडक फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...