आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind the Scenes: पोलिसांपासून गुंडापर्यंत सर्वांचे टार्गेट असते ही महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कॉटलंडहून आलेल्या माशा पौरने यात भूरीची भूमिका केली आहे. - Divya Marathi
स्कॉटलंडहून आलेल्या माशा पौरने यात भूरीची भूमिका केली आहे.
गोरखपूर (उत्तर प्रदेश)- 17 जूनला 2 बॉलिवूड फिल्म रिलीज होत आहे. एक आहे 'उडता पंजाब' तर दुसरा चित्रपट आहे 'भूरी'.चित्रपटाची कथा एका अशा महिलेची आहे जिच्यावर सगळ्या गावाची वाईट नजर असते. चित्रपटाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे, की 'भूरी'ची कथा 'उडता पंजाब'ला टक्कर देणारी आहे. या चित्रपटाची संपूर्ण शुटिंग उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाली आहे. त्यामुळे येथील लोकांना हा चित्रपट आपला वाटत आहे. आज आम्ही या चित्रपटाचे Behind the Scenes घेऊन आलो आहोत खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी.

काय आहे 'भूरी'ची स्टोरी
- चित्रपटाचे म्युझिक लॉन्च 3 मे रोजी मुंबईत झाले होते.
- या चित्रपटाची कथा एक सुंदर महिलेभवती फिरते. तिचे नाव असते भूरी. भूरीचे लग्न गावातील एका शेतकऱ्यासोबत होते.
- लग्न होऊन ती सासरी आल्यानंतर गावातील पोलिस अधिकारी, गुंड, राजकीय नेते, चोर या सर्वांची नजर भूरीवर पडते. प्रत्येकालाच ती आपली झाली पाहिजे असे वाटत राहाते.
- त्यासाठी सर्वजण तिच्या पतीला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करत राहातात. जेणे करुन वैतागून तो त्याची पत्नी त्यांच्या हवाली करेल.
- अशा परिस्थितीत एक महिला समाजातील वाईट प्रवृत्तींशी कसा लढा देते हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

हे आहेत कलाकार
- या चित्रपटात काही नवोदित तर काही बडे कलाकारही दिसणार आहेत.
- स्कॉटलंडहून आलेल्या माशा पौरने यात भूरीची भूमिका केली आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.
-याशिवाय रघुवीर यादव, आदित्य पांचोली, कुनिका सदानंद लाल, शक्ती कपूर, मोहन जोशी, मुकेश तिवारी, मनोज जोशी, सीताराम पांचाल हे मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'भूरी' चे Behind the Scenes
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)