आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमीवर राजकारण, भुजंग प्रसाद आणि चंदनकुमारांना TWITTER वर शुभेच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्विटरवर लालू आणि नितीशकुमारांसंदर्भात करण्यात आलेले ट्विट - Divya Marathi
ट्विटरवर लालू आणि नितीशकुमारांसंदर्भात करण्यात आलेले ट्विट
पाटणा - बिहारमधील निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे, त्यातच आज (बुधवार) नागपचंमीनिमीत्त भुजंग प्रसाद आणि चंदनकुमार प्रकरण पुन्हा एकदा सोशल साइट्सवर चर्चेचा विषय ठरले आहे. नागपंचमी निमीत्त या दोन्ही नावांचा वापर करुन ट्विटर युजर्सने लालू आणि नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतः विषाचे घोट घेण्याचा दावा करणारे लालू आणि चंदनाच्या दोह्याचा दाखला देणारे नितीशकुमार यांच्यावर सोशल मीडिया युजर्सने #NagPanchami हॅशटॅगने अनेक ट्विट केले आहेत. कोणी त्यांना शुभेच्छा दिल्या तर कोणी या सणानिमीत्त त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
केजरीवालही झाले टीकेचे लक्ष्य
लालू आणि नितीशकुमार यांच्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही युजर्सने टीकेची झोड उठवली. या महिन्याच्या शेवटी दिल्लीत आयोजित बिहार सन्मान कार्यक्रमात केजरीवाल आणि नितीशकुमार एकाच मंचावर येणार आहेत. त्यांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांच्या जनता दल संयुक्तला (जेडीयू) पाठिंबा देणार असल्याची घोषणा त्यांनी आधीच केली आहे. शक्यता आहे, की केजरीवाल प्रचारासाठीही बिहारमध्ये जातील. त्यामुळे युजर्सकडून नागपंचमीनिमीत्त त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला.
@jeetensingh ने ट्विट केले आहे, की @NitishKumar आणि @ArvindKejriwal आज एकाच वाटीत दूध पितील आणि बिहार पॅकेजवर जहर ओकतील.

काय आहे भुजंग प्रसाद आणि चंदनकुमार प्रकरण
नितीशकुमार यांना जेडीयू आणि लालू प्रसाद यादवांच्या आरजेडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले तेव्हा लालू यादवांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मी विष पिण्यासही तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ट्विटरवर युजर्सच्या प्रश्नांना उत्तर देताना नितीशकुमारांनी एक दोहा म्हटला होता. त्यात त्यांनी चंदनाला सापाने वेढा टाकला तरी त्याच्या विषाचा परिणाम त्यावर होत नसल्याचा दाखला दिला होता. त्यावरुन एका ट्विटर यूजर्सने लालूंच्या सोबतीत बिहारचा विकास कसा करणार असा प्रश्न केला होता. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच झालेल्या बिहार दौऱ्यात कोण भुजंग प्रसाद आणि कोण चंदनकुमार हे समजत नसल्याचे सांगत या नेत्यांची खिल्ली उडवली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नागपंचमीनिमीत्त पोस्ट करण्यात आलेले व्यंगचित्र