आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhupendra Huda News In Marathi, Haryana Chief Minister, Divya Marathi

यापुढे मोदींच्या कार्यक्रमांत उपस्थित राहणार नाही, हर‍ियाणाचे मुख्‍यमंत्री हुडा यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैथल (हरियाणा) - हरियाणामध्ये मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य सरकारच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुडा यांची उपस्थितांनी फजिती केली. या वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात इतका राजकीय रंग चढला की यापुढे मोदींच्या उपस्थितीत एकाही कार्यक्रमाला हजर राहणार नाही, अशी घोषणा हुडांनी करून टाकली.

निमित्त होते महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्यमंत्री कृष्णपाल गुज्जर यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला झालेल्या प्रचंड गर्दीत राज्यातील काँग्रेस समर्थकांपेक्षा मोदींच्या समर्थकांचीच गर्दी होती. मोदी समारंभाला पोहोचेपर्यंत गुज्जर आणि गडकरी यांची भाषणे झाली. ही भाषणे सुरू असताना मोदीसमर्थक शांत राहिले. मात्र, भाषणे संपताच काँग्रेसविरोधी घोषणाबाजी सुरू झाली. या गर्दीचा आवेशही इतका प्रचंड होता की त्यांना आवरणे कठीण झाले होते.


मोदींचे आवाहन
मोदी आल्याचे लक्षात येताच गर्दीतून ‘मोदी... मोदी’च्या घोषणा सुरू झाल्या. दुसरीकडे हुडा यांचे भाषण सुरूच होते. यावर मोदींनी जनसमुदायला अभिवादन करून शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता गर्दीचा गोंधळ सुरूच राहिला. हुडा यांना भाषण करताच आले नाही. थोड्या वेळाने मोदींच्या हस्ते कळ दाबून महामार्गाच्या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. नंतर हुडा पुन्हा भाषणासाठी उभे राहिले. मात्र, लोकांनी त्यांना भाषण कर करू दिलेच नाही.

कॅन्सरपेक्षाही भयंकर : मोदी
भ्रष्टाचार हा देशाला लागलेला कॅन्सरपेक्षा भयंकर रोग असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी भाषणात सांगितले. यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलेल, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. भ्रष्टाचाराचा हा रोग देशाला पोखरत चालला आहे. तो संपवायचा असेल तर संपूर्ण देशात मानसिकता बदलावी लागेल. आता या देशातील जनता फार दिवस भ्रष्टाचार सहन करू शकणार नाही, असेही मोदी म्हणाले.

मोदी उवाच्...
> मुसळधार पाऊस झाला की रस्ते गायब होतात. हा पैसा जातो कुठे, कुणालाच कळत नाही.
> सध्याच्या रेल्वे जाळ्यामुळे एकविसाव्या शतकात असलेली वाहतुकीची गरज पूर्ण होणार नाही.
> ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे आपल्याला या देशात विणावे लागेल.
> प्रत्येक गावात गॅस आणि पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून मिळेल, अशी व्यवस्था करावी लागेल.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय : मोदी पोहोचण्यास उशीर असल्याचे पाहून गुज्जर व गडकरी यांच्यानंतर मुख्यमंत्री हुडा भाषण करावयास उठले. त्यांनी लिखित भाषण वाचण्यास प्रारंभ करताच समोर उपस्थित गर्दीतून हुडा यांची टर उडवणे सुरू झाले. इतक्यात मोदींचे हेलिकॉप्टर कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि हुडा यांच्या भाषणाचा फज्जाच उडाला.