आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhutia On The Ball In The Political Field News In Divya Marathi

भायचुंग भुतिया : भाजप नंतर, पहिली लढत गोरखांशीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दार्जिलिंग - तृणमूलच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू भायचुंग भुतिया जीन्स, टी शर्ट आणि जॅकेट या वेशात राजकीय नेते वाटतच नाहीत. पण कसलेल्या नेत्याप्रमाणे ते भाषण करतात. ते लोकांना सांगतात, मत देण्यासाठी विरोधी पक्षाकडून पैसे देण्यात आले, तर ते घ्या, पण मत मलाच द्या. भाषण सुरु आहे, आणि त्यांच्यासमोर उभी असलेली मुले स्वाक्षरीसाठी त्यांची वाट पाहत आहेत. भाषण संपताच भुतिया त्यांना स्वाक्षरी देतात, आणि पुढच्या प्रचाराला निघतात. मुले खूश! पण येथील तरुणांना त्यांच्याबाबत काय वाटते? याचे उत्तर मिनग्मा शेर्पा या तरुणीने दिले, ती म्हणजे भायचुंग क्रीडापटू आहेत, त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो.

नव्यानेच नेते बनलेले भुतिया यांच्यासाठी ही नवी भूमिकादेखील खेळाप्रमाणेच आव्हानात्मक आहे. त्यांच्यासमोर आहेत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस. एस. अहलुवालिया. त्यांच्या प्रचाराची धुरा गोरखा जनमुक्ती मोर्चाने उचललेली. येथे प्रचार कार्यालये भाजपची, पण त्यात कार्यकर्ते सर्व मोर्चाचे असतील. गोरखालॅँडच्या मुद्दय़ावर मोर्चाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे. गत निवडणुकीतही हीच स्थिती होती आणि जसवंतसिंह जिंकले होते. येथे गोरखा लोकांमध्ये जनमुक्ती मोर्चाचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यामुळे भुतियाने सर्व लक्ष पर्वतीय भागातील मतदारांवर केंद्रित केले आहे. ते नेपाळी भाषेत लोकांशी भावनिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. सांगतात, मी तुमच्यातीलच एक आहे. फक्त एकदा संधी द्या! पाच वर्षांनंतर माझ्याकडून खेळाडू म्हणून नव्हे, तर राजकारणी म्हणून हिशेब घ्या!

राजकारणात येऊन
राजकारणात इतक्या लवकर येईन असे वाटले नव्हते. राजकारण फुटबॉल सामन्यासारखे सोपे नाही. कारण नेत्यांनी खोटे बोलून बोलून ते क्लिष्ट करून टाकले आहे. मी नवा आहे, अजून शिकत आहे.

मोदींची इथे हवाच नाही : भुतिया
देशात मोदींचे नाव चालत आहेच. त्याचे कारण आहे काँग्रेसचे अपयश आणि घोटाळे. तसे मोदी व भाजप लाट तयार करण्यात तरबेज आहेत. परंतु आमच्या या परिसरात मोदींचा फारसा प्रभाव नाही.

मुद्दय़ांच्या बाबतीत
गोरखालँडच्या मुद्दय़ावर लोकांना आतापर्यंत धोका झाला आहे. मागील निवडणूक भाजप याच मुद्दय़ावर जिंकली होती. विकासाचे तर नाव नाहीच. अहलुवालियाही विकासावर आता मते मागत नाहीत.