आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhuvan Website News In Marathi, Urban Planning, Divya Marathi

गुगल नव्हे, ‘भुवन’च्या नकाशानुसार बनतील योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - कोणत्याही शहराचा मुख्य प्रकल्प तयार करायचा असेल, संपत्ती करासाठी सर्वेक्षण करायचे असेल, ड्रेनेज सिस्टिमसाठी योजना बनवायची असेल, तर शासकीय यंत्रणेला आता गुगल मॅपचा आधार घ्यावा लागणार नाही. यासाठी आता केंद्र सरकारच्या ‘भुवन’ नावाच्या वेबसाइटच्या नकाशाच्या आधार घेतला जाऊ शकतो. शहराची कोणतीही गल्ली, बाजार, रोड नेटवर्क याची माहिती मोफत घेतली जाईल. याचा लाभ नागरिकांनाही मिळणार आहे.

केंद्राच्या एनयूआयएसने बनवली साइट
केंद्र सरकारच्या नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर (एनयुआयएस) ने ‘भुवन’ साठी रिमोट सेंसिंगमार्फत डिजिटलाइज्ड मॅपसहित आवश्यक माहिती व नकाशा गोळा केले आहेत. यामध्ये रस्ते, तलाव, वाहतूकसहित मास्टर प्लॅनसाठी आवश्यक माहिती डिजिटलाइज्ड मॅपमध्ये नोंद करण्यात आली. सरकारी योजनांमध्ये या माहितीचा व नकाशांचा वापर व्हावा, असा केंद्राचा मानस आहे. ही माहिती बीएचयूव्हीएएन3.एनआरएससी.जीओव्ही.आयएन bhuvan3.nrsc.gov.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. शहर, क्षेत्र किंवा राज्याचे नाव टाकून नकाशा प्राप्त केल्या जाऊ शकतो.

देशातील 152 शहरे सहभागी
एनयूआयएसने भुवनमध्ये सध्या देशातील 152 शहरांचा समावेश केला आहे. त्याचा पुढे विस्तार करण्यात येणार आहे. ही वेबसाइट नुकतीच लाँच केली. वेबसाइटला निरंतर अपडेट करण्यात येत आहे. येणा-या काळात देशातील सर्व शहरे व त्यानंतर गावांचासुद्धा समावेश करण्यात येणार आहे. देशातील 100 मोठ्या शहरांची हाय रिझॉल्युशन इमेजसुद्धा अपलोड करण्यात आली आहे.