आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे भुवीच्या लग्नाची पत्रिका; सकाळी निघेल वरात, रात्री असेल रिसेप्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर आणि नुपूर - Divya Marathi
भुवनेश्वर आणि नुपूर
जोधपूर- भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार 23 नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकत आहे. भुवनेश्वर मेरठ येथील नुपूरशी विवाहबद्ध होणार आहे. लग्नाच्या पत्रिका वाटण्यास सुरूवात झाली आहे. भुवीने आपल्यासाठी आणि नुपूरसाठी खास मारवाडी बुट बनवले आहेत.  

असा आहे लग्नाचा कार्यक्रम....
- भुवीच्या लग्नसोहळा 23 नोव्हेंबरला सकाळी सुरू होईल. भुवीचे वडील किरणपाल सिंह यांनी सांगितले की, भुवी सकाळी 10 वाजता घोडीवर सवार होईल आणि साडे दहा वाजता त्याच्या घरातून वरात निघेल. थोडा वेळ पाई चालल्यानंतर वरात वाहनाने भैरवा गोल्ड रिसॉर्टमध्ये पोहोचेल. रिसॉर्टच्या बाहेर पुन्हा वरात तयार होईल आणि तेथून रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर लग्नाच्या विधींना सुरूवात होईल. यानंतर दुपारचे लंच होईल आणि संध्याकाली रिशेप्शन ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यानंतर दिल्ली आणि मुंबईत पार्टी होणार आहे.
 
भारतीय संघाचे खेळाडू लावणार हजेरी...
- भुवी आणि नुपूर याच्या विवाहसोहळ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू हजेरी लावणार आहेत. 
- गेल्या महिन्या नुपूर आणि भुवीचा साकरपूडा झाला होता. मेरठ येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नुपूरने नोएडामधून बीटेक पुर्ण केले आणि तेथेच एका खाजगी कंपनीत ती काम करत आहे.

सर्व क्रिकेटर आणि फिल्मस्टार्स आहे यांच्या बुटांचे चाहते...
- विषेश म्हणजे, जोधपूर येथील पप्पू मोजडी हाऊसच्या बुटांचे संपूर्ण भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू चाहेत आहेत. सचिनसह अनेक क्रिकेट खेळाडूंनी येथून बनलेले बुट आपल्या लग्नात घातले आहेत. माहानायक अमिताभ बच्चनसह अनेक फिल्मस्टार्स सुध्दा याच दूकानातून बुट मागवतात.

फोटो : एल देव जांगिड
पुढील स्लाइडवर पाहा आणखी काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...