आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Bee's Helping Mother Not Spent On Her Dautors

‘बिग बी’ची मदत ढापून आईने दोन मुलींना वा-यावर सोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - सोडून दिलेल्या दोन बहिणींना महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला खरा; मात्र मदतीनंतर आईने मुलींना वा-यावर सोडल्याची घटना घडली.


मुलींच्या मदतीसाठी अमिताभ यांनी महिलेकडे दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. मात्र तो मिळाल्यानंतर महिलेने मुलींना एकटे सोडून पळ काढल्याचे उघड झाले आहे. रिमझिम (12) व अंजली (11) अशी या मुलींची नावे असून शाळा प्रशासन आता त्यांची देखभाल करत आहे. शिखा पांडे या महिलेने मुजफ्फरपूरचा बनावट पत्ता
सांगून येथील शांतिनिकेतन विद्यालयात मुलींना प्रवेश दिला व त्यानंतर ती परत आली नाही, असे मुख्याध्यापक अविनेश्वर प्रसाद सिंग यांनी सांगितले.


प्रसारमाध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना दोन लाखांची मदत देऊ केली व उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील ऐश्वर्या राय-बच्चन विद्यालयाच्या 2008 मधील उद्घाटन समारंभास मुलींना निमंत्रित केले. उद्घाटन समारंभाच्या तीन दिवस आधी महिला बेपत्ता झाल्याचे अमिताभ यांना कळले. पती तुरुंगात असून आपल्यासमोर अनेक आर्थिक अडचणी असल्याचे तिने मुख्याध्यापकाला सांगितले होते. दुस-या दिवशी महिलेने धनादेश घेतला व त्यानंतर ती इकडे फिरकली नाही. मुख्याध्यापकांना दोन मुले असतानादेखील ते या दोन मुलींची सांभाळ करत आहेत. संधी मिळाल्यास अमिताभ यांना हे संपूर्ण प्रकरण मी सांगेन. मुली सुरुवातीस आईच्या आठवणीने व्याकुळ होत होत्या, मात्र, त्यानंतर हळूहळू तिचा विसर पडला, असे सिंग म्हणाले.