आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Crowd Turn To Me And Its Not Want Opposition Narendra Modi

जनलाटेमुळे विरोधक, शिवसेनेचा जळफळाट- नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनपत - आपण निर्माण केलेल्या विराट जनलाटेमुळे विरोधक, शिवसेनेचा जळफळाट होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हरियाणातील सोनपत येथील प्रचारसभेत सांगितले. दिल्लीत राहून सरकार चालवण्याऐवजी मोदी प्रचारात मग्न असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याशिवाय इनलोदचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांच्या तिहारमधून हरियाणा सरकार चालवू, या वक्तव्याचाही त्यांनी
जाब विचारला.

मोदी म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आपल्या आपल्या प्रचारसभांमुळे लोक रुदन करत असल्याचे आपण अनुभवले नाही. मात्र, आता महाराष्ट्र व हरियाणात आपण प्रचार करत असल्यामुळे लोकांचे रडगाणे सुरू झाले आहे.

जम्मू-काश्मीरात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार होत असताना मोदी महाराष्ट्रात प्रचार करण्यात मग्न का आहेत, या शिवसेनेच्या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन बाळगले. सभेत मोदी म्हणाले, आपल्या सभांना उसळणा-या गर्दीमुळे विरोधकांची चिंता वाढली आहे. ही जनलाट काँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.