आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Issue Making By Congress MLA On Priyanka Gandhi's Photo

प्रियंका गांधींचे छायाचित्र पाहण्याच्या मुद्द्यावर कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदारांचा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव - कर्नाटक विधानसभेच्या कामकाजादरम्यान बुधवारी भाजपचा एक आमदार मोबाइलवर प्रियंका गांधी वढेरा यांचे छायाचित्र पाहताना दिसला. या मुद्द्यावरून गुरुवारी विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. भाजप सदस्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत भाजप निर्लज्ज नेत्यांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.

कायदामंत्री टी. बी. जयचंद्र यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, भाजप सदस्य अशा घटनांत सहभागी होऊन सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी अशा घटना रोखण्यासाठी त्वरित पाऊल उचलले पाहिजे. काँग्रेसच्या अन्य आमदारांनी मंत्र्यांना पाठिंबा दिला. विधानसभा अध्यक्ष के. थिम्मप्पा यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आणि आरोपी सदस्याने आपल्या दालनात येऊन माफी मागितल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सभागृहात यापुढे मोबाइल न आणण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेस आमदारांनी कडक कारवाईची मागणी सुरूच ठेवली. यानंतर अध्यक्षांनी काही काळ कामकाज स्थगित करून कायदामंत्र्यांस निंदाव्यंजक ठराव वाचण्यास सांगितले.